English

खालील ओळींचा अर्थ लिहा: ‘रडू नकोस खुळे, ऊठ! आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यातनि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’ - Marathi

Advertisements
Advertisements

Question

खालील ओळींचा अर्थ लिहा:

‘रडू नकोस खुळे, ऊठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात 
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’

Long Answer
Advertisements

Solution

आरशात दिसणारी स्त्री संसाराच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्रीला सांगते – “अशी हताश होऊन रडू नकोस. स्वतःला सावर आणि धैर्याने उभी राहा. डोळ्यातील अश्रू पुसून टाक, जणू ते शेजारच्या तळ्यात विसर्जित कर. आतापर्यंत सहन केलेले दुःख, वेदना आणि अन्याय विसरून जा. आत्मविश्वास आणि नव्या उत्साहाने पुढचे आयुष्य आपल्या स्त्रीत्वाच्या सामर्थ्याने जग.

त्या तळ्यात नुकतीच उमललेली ताजी, सुंदर कमळे हातात घे. त्या कमळांप्रमाणे नव्या विचारांची प्रेरणा घे आणि भविष्यातील जीवनासाठी नवी दिशा शोध. नव्या जिद्दीने, ठामपणे आणि आत्मसन्मानाने आपले स्वाभाविक आयुष्य जग. जुन्या परंपरांचे बंधन झुगारून दे आणि मुक्तपणे पुढे चालत राह.”

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×