Advertisements
Advertisements
Question
खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) समुद्राची संचार स्थाने - (२)
(य) ..........
(र) ..........
(२) समुद्राने केलेल्या दोन मानवी क्रिया - (२)
(य) ..........
(र) ..........
|
समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड. |
(३) अभिव्यक्ती: (४)
‘समुद्र कोंडून पडलाय’ या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
Solution
(१) समुद्राची संचार स्थाने -
(य) शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून
(र) शहरांतल्या वस्त्यांमधून
(२) समुद्राने केलेल्या दोन मानवी क्रिया -
(य) हातावर डोके ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी बघतो.
(र) शिणलेल्या पापण्या मिटतो.
(३)
समुद्र म्हणजे अमर्याद, सतत प्रवाही आणि सर्जनशील मानवी जीवनाचे प्रतीक आहे. असे अथांग आणि मुक्त जीवन जेव्हा महानगरांच्या चौकटीत अडकते, तेव्हा निर्माण होणारी घुसमट आणि अस्वस्थता कवी वसंत आबाजी डहाके यांनी ‘समुद्र कोंडून पडलाय’ या शीर्षकातून प्रभावीपणे व्यक्त केली आहे.
शहरांमध्ये उंचच उंच इमारती जणू तुरुंगासारख्या उभ्या राहिल्या आहेत. त्या इमारतींमध्ये बाल्यावस्था घुसमटते आहे. या भव्य इमारतींच्या जाळ्यात समुद्र जणू कैद झाला आहे. समुद्राचे स्वरूप मुळात विशाल, अथांग आणि सतत उसळणारे असे असते; परंतु भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या महानगरी जीवनशैलीने या व्यापक जीवनाला बंदिस्त केले आहे. जणू जीवनदायी पाण्यालाच कबर घातली आहे किंवा अमृताचे विषात रूपांतर झाले आहे.
समुद्राच्या या वेदनादायी अवस्थेचे चित्रण कवीने शीर्षकातूनच अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीने केले आहे. म्हणूनच ‘समुद्र कोंडून पडलाय’ हे शीर्षक या कवितेस अत्यंत समर्पक आणि अर्थपूर्ण ठरते.
