Advertisements
Advertisements
Question
खालील मध्ये फरक स्पष्ट करा.
भाषावाद आणि प्रादेशिकवाद
Distinguish Between
Advertisements
Solution
| भाषावाद | प्रादेशिकवाद |
| आपल्या स्वतःच्या भाषेबद्दल वाटणारी टोकाची निष्ठा म्हणजे भाषावाद होय. यामुळे भाषेच्या आधारावर लोकांमध्ये संघर्ष निर्माण होतो. | आपल्या राष्ट्रापेक्षा स्वतःच्या राज्याबद्दल किंवा प्रदेशाबद्दल वाटणारी अतीव निष्ठा म्हणजे प्रादेशिकवाद होय. यामुळे आंतरराज्यीय स्पर्धा निर्माण होते. |
| एकाच भाषेच्या लोकांनी एकाच राज्यात असावे, या इच्छेतून प्रादेशिकवाद निर्माण होतो. तसेच, स्वतःच्या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याची तीव्र भावना यात असते. | एकाच भाषेच्या लोकांनी एकाच राज्यात असावे, या इच्छेतून प्रादेशिकवाद निर्माण होतो. तसेच, स्वतःच्या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याची तीव्र भावना यात असते. |
| अलीकडच्या वर्षांत भाषावाद अधिक गंभीर आणि तीव्र झाला आहे. यातून ‘भाषिक राष्ट्रवाद’ निर्माण होऊ शकतो, जो फुटिरतावादाला खतपाणी घालतो. | स्वतःच्या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याच्या इच्छेतून राज्या-राज्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते. |
| भाषिक अल्पसंख्याकांना जेव्हा असे वाटते की त्यांचा अनादर होत आहे, तेव्हा अशा संकुचित दृष्टिकोनातून दुसऱ्या भाषिक गटाला चुकीची वागणूक दिली जाते. | जेव्हा एखाद्या राज्यातील लोकांना प्रादेशिक असमतोल आणि सामाजिक-आर्थिक विकासाचा अभाव जाणवतो, तेव्हा वेगळ्या राज्याची मागणी पुढे येते. |
| भाषावाद लोकांना भाषेच्या आधारावर विभागतो. यातून निर्माण होणारा भाषिक राष्ट्रवाद भारतात फुटीरतावादी प्रवृत्तींना बळ देऊ शकतो. | हा एक विभाजक घटक आहे जो देशातील इतर प्रदेशातील लोकांबद्दल अनादर निर्माण करतो. जेव्हा विशिष्ट प्रदेशाच्या इतिहासाचे अतिगौरवीकरण केले जाते, तेव्हा राष्ट्रीय एकात्मतेत अडथळा येतो. |
| भाषावादामुळे संपूर्ण देशात ‘हिंदी’ ही संघराज्याची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यास विरोध झाला आहे. उदा. भाषिक अल्पसंख्याकांवरील अन्याय, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद. | प्रादेशिकवादामुळे राज्यांच्या हक्कांसाठीच्या चळवळी आणि फुटीरतावादी सशस्त्र चळवळी निर्माण झाल्या आहेत. उदा. जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न, पंजाबची समस्या, आसामचा प्रश्न इत्यादी. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
