हिंदी

खालील मध्ये फरक स्पष्ट करा. भाषावाद आणि प्रादेशिकवाद - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मध्ये फरक स्पष्ट करा.

भाषावाद आणि प्रादेशिकवाद

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

भाषावाद प्रादेशिकवाद
आपल्या स्वतःच्या भाषेबद्दल वाटणारी टोकाची निष्ठा म्हणजे भाषावाद होय. यामुळे भाषेच्या आधारावर लोकांमध्ये संघर्ष निर्माण होतो. आपल्या राष्ट्रापेक्षा स्वतःच्या राज्याबद्दल किंवा प्रदेशाबद्दल वाटणारी अतीव निष्ठा म्हणजे प्रादेशिकवाद होय. यामुळे आंतरराज्यीय स्पर्धा निर्माण होते.
एकाच भाषेच्या लोकांनी एकाच राज्यात असावे, या इच्छेतून प्रादेशिकवाद निर्माण होतो. तसेच, स्वतःच्या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याची तीव्र भावना यात असते. एकाच भाषेच्या लोकांनी एकाच राज्यात असावे, या इच्छेतून प्रादेशिकवाद निर्माण होतो. तसेच, स्वतःच्या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याची तीव्र भावना यात असते.
अलीकडच्या वर्षांत भाषावाद अधिक गंभीर आणि तीव्र झाला आहे. यातून ‘भाषिक राष्ट्रवाद’ निर्माण होऊ शकतो, जो फुटिरतावादाला खतपाणी घालतो. स्वतःच्या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याच्या इच्छेतून राज्या-राज्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते.
भाषिक अल्पसंख्याकांना जेव्हा असे वाटते की त्यांचा अनादर होत आहे, तेव्हा अशा संकुचित दृष्टिकोनातून दुसऱ्या भाषिक गटाला चुकीची वागणूक दिली जाते. जेव्हा एखाद्या राज्यातील लोकांना प्रादेशिक असमतोल आणि सामाजिक-आर्थिक विकासाचा अभाव जाणवतो, तेव्हा वेगळ्या राज्याची मागणी पुढे येते.
भाषावाद लोकांना भाषेच्या आधारावर विभागतो. यातून निर्माण होणारा भाषिक राष्ट्रवाद भारतात फुटीरतावादी प्रवृत्तींना बळ देऊ शकतो. हा एक विभाजक घटक आहे जो देशातील इतर प्रदेशातील लोकांबद्दल अनादर निर्माण करतो. जेव्हा विशिष्ट प्रदेशाच्या इतिहासाचे अतिगौरवीकरण केले जाते, तेव्हा राष्ट्रीय एकात्मतेत अडथळा येतो.
भाषावादामुळे संपूर्ण देशात ‘हिंदी’ ही संघराज्याची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यास विरोध झाला आहे. उदा. भाषिक अल्पसंख्याकांवरील अन्याय, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद. प्रादेशिकवादामुळे राज्यांच्या हक्कांसाठीच्या चळवळी आणि फुटीरतावादी सशस्त्र चळवळी निर्माण झाल्या आहेत. उदा. जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न, पंजाबची समस्या, आसामचा प्रश्न इत्यादी.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×