English

खालील फरक स्पष्ट करा: जिल्हा आयोग आणि राष्ट्रीय आयोग - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

खालील फरक स्पष्ट करा:

जिल्हा आयोग आणि राष्ट्रीय आयोग

Distinguish Between
Advertisements

Solution

क्र. फरकाचा मुद्दा जिल्हा आयोग राष्ट्रीय आयोग
1. अर्थ जिल्हा स्तरावर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राज्य शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या आयोगास जिल्हा आयोग असे म्हणतात. राष्ट्रीय स्तरावर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी केंद्र शासनाने सूचनेद्वारे स्थापन केलेल्या आयोगास राष्ट्रीय आयोग असे म्हणतात.
2. अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश किंवा समकक्ष व्यक्तीची जिल्हा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांची राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते.
3. सदस्य जिल्हा आयोगाची सदस्य संख्या दोन पेक्षा कमी आणि केंद्र शासनाशी सल्ला- मसलत करून निश्‍चित केलेल्या संख्येपेक्षा अधिक नसते. केंद्रीय आयोगाची सदस्य संख्या ४ पेक्षा कमी आणि केंद्र शासनाशी विचार- विनिमय करून निश्‍चित केलेल्या संख्येपेक्षा अधिक नसते.
4. सदस्य कार्यकाळ नेमणुकीपासुन ५ वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी असतो. नेमणुकीपासून ५ वर्षे किंवा वयाची ६७ वर्षे आणि अध्यक्षासाठी वयाची ७० वर्षे यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी असतो.
5. कार्यसीमा  जिल्हा आयोगाची कार्यसीमा संबंधित जिल्हा असते. राष्ट्रीय आयोगाची कार्यसीमा संपूर्ण देश असते.
6. आर्थिक अधिकारक्षेत्र वस्तू किंवा सेवेचे मूल्य रू. एक कोटीपेक्षा अधिक नसलेल्या तक्रारी वस्तू किंवा सेवेचे मूल्य रु. दहा कोटीपेक्षा अधिक रकमेच्या तक्रारी.
7. अपील जिल्हा आयोगाच्या आदेशाविरुद्ध राज्य आयोगाकडे दाद मागता येते. राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×