Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील फरक स्पष्ट करा:
जिल्हा आयोग आणि राष्ट्रीय आयोग
फरक स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
| क्र. | फरकाचा मुद्दा | जिल्हा आयोग | राष्ट्रीय आयोग |
| 1. | अर्थ | जिल्हा स्तरावर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राज्य शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या आयोगास जिल्हा आयोग असे म्हणतात. | राष्ट्रीय स्तरावर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी केंद्र शासनाने सूचनेद्वारे स्थापन केलेल्या आयोगास राष्ट्रीय आयोग असे म्हणतात. |
| 2. | अध्यक्ष | जिल्हा सत्र न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश किंवा समकक्ष व्यक्तीची जिल्हा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. | सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांची राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. |
| 3. | सदस्य | जिल्हा आयोगाची सदस्य संख्या दोन पेक्षा कमी आणि केंद्र शासनाशी सल्ला- मसलत करून निश्चित केलेल्या संख्येपेक्षा अधिक नसते. | केंद्रीय आयोगाची सदस्य संख्या ४ पेक्षा कमी आणि केंद्र शासनाशी विचार- विनिमय करून निश्चित केलेल्या संख्येपेक्षा अधिक नसते. |
| 4. | सदस्य कार्यकाळ | नेमणुकीपासुन ५ वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी असतो. | नेमणुकीपासून ५ वर्षे किंवा वयाची ६७ वर्षे आणि अध्यक्षासाठी वयाची ७० वर्षे यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी असतो. |
| 5. | कार्यसीमा | जिल्हा आयोगाची कार्यसीमा संबंधित जिल्हा असते. | राष्ट्रीय आयोगाची कार्यसीमा संपूर्ण देश असते. |
| 6. | आर्थिक अधिकारक्षेत्र | वस्तू किंवा सेवेचे मूल्य रू. एक कोटीपेक्षा अधिक नसलेल्या तक्रारी | वस्तू किंवा सेवेचे मूल्य रु. दहा कोटीपेक्षा अधिक रकमेच्या तक्रारी. |
| 7. | अपील | जिल्हा आयोगाच्या आदेशाविरुद्ध राज्य आयोगाकडे दाद मागता येते. | राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
