Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
मुखीं हरि! वसो तुझी
कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी
सकलकामना मावली;।।
Advertisements
Solution
प्रस्तुत ओळ कवी मोरोपंतांच्या 'केकावली' संग्रहातील 'भरतवाक्य' या पद्यरचनेतील आहे. या केकावलीतून कवी मोरोपंत सज्जन माणसांच्या संगतीचे व चांगल्या विचारांच्या श्रवणाचे महत्त्व सांगू पाहत आहेत. कोणत्याही लोभामोहाला बळी पडू नये, खोटा अहंकार सोडून भक्तिमार्ग आपलासा करावा आणि सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या परमेश्वराच्या नामस्मरणात मन रमवावे अशी शिकवण या केकावलीतून ते आपल्याला देतात.
मोरोपंतांच्या प्रस्तुत केकावलीची भाषा संस्कृतप्रचुर, अलंकारयुक्त मराठी शब्दांनी सजलेली आहे. पंडिती काव्याचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य तिच्यात आढळते. सकलकामना, कुशलधामनामावली यांसारखे संस्कृतप्रचुर शब्द कवीने कवितेत ठिकठिकाणी पेरले आहेत. कुशलधामनामावली-सकलकामना मावली अशा शब्दांतून यमक अलंकार साधल्यामुळे या कवितेला गेयता प्राप्त झाली आहे. यात पृथ्वीवृत्त वापरले गेले आहे. श्लोकांसारखी ओघवती, रसपूर्ण, प्रासादयुक्त भाषा वापरल्यामुळे हे काव्य श्रवणीय वाटते.
'केका' म्हणजे मोराचा टाहो आणि 'आवली' म्हणजे पंक्ती. मोरोपंतांनी स्वत:स 'मोर' कल्पून, ईश्वराला मारलेल्या हाकांना, ईश्वराच्या केलेल्या आळवणीला 'केकावली' असे म्हटले आहे. ज्याप्रमाणे नाटकात शेवटी भरतवाक्य म्हटले जाते त्याप्रमाणे केकावलीच्या उपसंहारातील या शेवटच्या पद्यरचनेला 'भरतवाक्य' म्हणतात, हेही या रचनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ______
सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे ______
खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा.
| गोष्टी | विनंती |
| (१) निश्चय | ______ |
| (२) चित्त | ______ |
| (३) दुरभिमान | ______ |
| (४) मन | ______ |
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
मति सदुक्तमार्गीं वळो
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
न निश्चय कधीं ढळो
‘सुसंगती सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;’ या ओळींचे रसग्रहण करा.
‘स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
सत्प्रवृत्त व्यक्तीची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.
वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा.
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. उत्तरे लिहा. (२)
1. सुसंगतीचे महत्त्व
- ___________
- __________
2. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी करावयाचे उपाय. (२)
- ___________
- ___________
|
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो; न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो; मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली, |
3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (२)
मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली;।
4. काव्यसाैंदर्य. (२)
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारे विचार साैंदर्य स्पष्ट करा.
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो।।
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
भरतवाक्य
- प्रस्तुत कवितेच्या कवीचे/कवयित्रीचे नाव लिहा. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)
