Advertisements
Advertisements
Question
कारणे शोधा.
पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो, कारण ______
Advertisements
Solution
पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो; कारण त्या म्हातारीला पुत्रभेटीचा आनंद मिळावा आणि तिचे शेवटचे दिवस समाधानात जावेत, अशी पोस्टमनची इच्छा होती.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

कारणे शोधा.
आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण ______
कारणे शोधा.
म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं, कारण ______
कारणे शोधा.
पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण ______
तुलना करा.
| व्यक्तीशी मैत्री | कवितेशी मैत्री |
| ______ | ______ |
| ______ | ______ |
| ______ | ______ |
| ______ | ______ |
‘वाट पाहणे’ या प्रक्रियेबाबत पुढील मुद्द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून तक्ता पूर्ण करा.
| वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी | वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी | वाट पाहण्याचे फायदे |
पाठाच्या (वाट पाहताना) शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत सांगा.
म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा.
‘वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे’, या विधानाची सत्यता पटवून द्या.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. एका शब्दात उत्तर लिहा. (२)
- थंडी कमी होण्याची वेळ- ______
- लहानपणी लेखिका आणि त्यांच्या भावंडांना गॅलरीत झोपायला मिळायचं तो महिना - ______
|
होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर; पण मार्च-एप्रिलमध्ये आम्हांला गॅलरीत झोपायला मिळायचं. |
२. वैशिष्ट्ये लिहा. (२)
लेखिकेने अनुभवलेल्या सुट्टीचे वेगळपण
३. स्वमत कृती- (३)
उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट तुम्ही पाहता का? कसे ते स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) तुलना करा. (२)
| व्यक्तीशी मैत्री | कवितेशी मैत्री |
| पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधीपण, केव्हापण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाट्टेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता. तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची. कधीही रात्री-मध्यरात्रीसुद्धा; पण मला मात्र कधीकधी खूप वाट बघायला लावायची. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं-अस्वस्थ होणं-कशातच मन लागेनासं होणं-आई, आत्याची ती बोलणी खाणं! आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत, असं उगाच वाटत राहतं. आमची आत्या तेव्हा उरुळीकांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरूळीला सहल जाण्याजोग वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी आठ वाजताच घरातून जायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरनं उरुळी. परतताना तसंच, गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी नऊ-साडेनऊसुद्धा व्हायचे. आम्ही भावंडं तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाज्यात उभी राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली, की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून, तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होत आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजतं; पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली कसली भीती वाटत राहायची. |
२) ओघतक्ता तयार करा. (२)
लेखिकेच्या आत्याच्या दररोजच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.
३) स्वमत - (३)
तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या वाट पाहण्याचा तुम्हांला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. उत्तरे लिहा: (2)
- म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार - ______
- आपल्या तरुण मुलाला ‘माणसं’ दाखवणारा - ______
| शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्रं हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ, समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्रं पोहोचवणारा सरकारी नोकर नाही. तो माणूस आहे, भला माणूस! आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही. तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. ‘वाट पाहणं’ ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! दु:ख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड-कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो. धीर धरायला शिकतो. एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते. ध्यास वाढत जातो. |
2. आकृती पूर्ण करा. (2)

3. स्वमतः (3)
‘वाट पाहणं’ ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
