English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांना अनुसरून लिहा. प्राणिजीवन

Advertisements
Advertisements

Question

काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांना अनुसरून लिहा.

प्राणिजीवन

Short/Brief Note
Advertisements

Solution

जगात दुसरीकडे कुठेही आढळणार नाहीत असे काही प्राणी आसाममधील काझीरंगा अभयारण्यात आढळतात. अत्यंत दुर्मीळ असणारा एकशिंगी गेंडा हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य. त्यामुळे हा गेंडा आसाम राज्याचे प्रतीकही बनला आहे. आफ्रिकेच्या नंतर इतके विविध व असंख्य पशुपक्षी आढळणारे काझीरंगा हे अभयारण्य आहे. येथे हुलॉक नावाचा शेपूट नसलेला वानर आढळतो, तर उंच, देखणे हत्ती, पांढरेशुभ्र गायबगळे, सुंदर व अर्धचंद्राकृती आकाराची शिंगे असलेल्या रानम्हशी आणि सारंगासारखे भासणारे हरणांचे कळपही येथे आढळतात. येथील एकशिंगी गेंडा जगातील प्रचंडकाय प्राण्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. साधारणपणे सकाळच्या वेळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळी काझीरंगातील प्राणिजीवन प्रत्यक्ष पाहायला मिळते.

shaalaa.com
स्थूल वाचन (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.2: काझीरंगा - स्वाध्याय [Page 17]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
Chapter 4.2 काझीरंगा
स्वाध्याय | Q १. (आ) | Page 17

RELATED QUESTIONS

काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांला अनुसरून लिहा.

भौगोलिक वैशिष्ट्ये


टीप लिहा.

एकशिंगी गेंडा


टीप लिहा.

गेंड्याच्या सवयी


टीप लिहा.

गायबगळे


‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.


टिपा लिहा.

ग्रँड कॅनॉल


टिपा लिहा.

व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर


खालील मुद्‌द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.

व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर


खालील संकल्पना स्पष्ट करा.

व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका....


खालील संकल्पना स्पष्ट करा.

व्हेनिस म्हणजे अद्‌भुत शहर...


खालील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे सोडवा.

(१) ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाचे कवी.
(२) एका साहित्यिकाचे आडनाव ‘श्रीपाद कृष्ण....’
(३) तुरुंगात असतानादेखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरून येई, असे साहित्यिक(देशभक्त).
(४) ‘सुधारक’ चे संपादक.
(५) कवी यशवंत यांचे आडनाव.
(६) विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचे आडनाव.
(७) मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपणनावातील आडनाव.
(८) कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव.


केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.


विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.


खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.

(१) पैसे न देता, विनामूल्य.
(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
(४) रहस्यमय.
(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.

(१)       
(२)  ×    
(३)      
(४) ×    
(५)      

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×