Advertisements
Advertisements
Question
‘झाडांच्या मनात जाऊ’ या कवितेचे रसग्रहण करा.
Advertisements
Solution
‘झाडांच्या मनात जाऊ’ ही कवी नलेश पाटील यांची कविता ‘हिरवं भान’ या कविता संग्रहातील घेतली आहे. या कवितेत निसर्गाच्या चैतन्याचा अनुपम सोहळा उत्कट प्रतिमांमधून कवींनी रंगवला आहे. झाडांच्या मनात शिरून त्याचे हृदगत जाणून घ्यायचे व आपणच अंती एखादे झाड होऊन निर्जन रानात डोलायचे, असा या कवितेचा प्रवास रसिकांना आनंददायी व समृद्ध करणारा ठरला आहे. वसंत ऋतूचे लोभसवाणे दर्शन या चराचरातील वनश्रीत कसे झाले आहे, याचे वर्णन कवींनी अनेक प्रतीके व प्रतिमा यातून दुग्गोचर केले आहे. फुलपाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण, डोळ्यांत झऱ्याचे पाणी, देवाघरची गाणी, तुषारांचे रोप, सूर्य ओंजळीतल्या पाण्यात पोहणे, सावलीला पंख फुटून त्यांचे झालेले काऊ अशा नितांत सुंदर प्रतिमा व प्रतीकांतून कवितेचा आशय समृद्ध झाला आहे व कवितेत नितळ सौंदर्याचा आविष्कार झाला आहे. ‘ईश्वरा, मला झाड बनवून निर्जन रानात टाक’ ही कवींची अंतिम इच्छा खूपच भावपूर्ण व हृदयस्पर्शी आहे. निसर्ग चित्र रेखाटतांना अम्लान शब्दकळेतून उमटलेला उत्कट भाव रसिकांना मोहन टाकणारा आहे. जणू आपणच निसर्गाच्या घटकात तादात्म्य पावून निसर्ग डोळ्यांत व हृदयात साठवतो आहोत, अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. कवीचे शब्द सामर्थ्य अनोख्या व उल्हसित प्रतिमांतून प्रकट झाले आहे. ध्रुपद व अंतरा असलेली ही गीतरचना यमकप्रधान आहे. प्रत्येक कडव्यात अनोखी भावस्थिती वर्णिली आहे. प्रासाद व माधुरी या काव्यगुणांनी मंडित झालेली ही गीतरचना मला हृदयस्थ भावली.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
पोपटी स्पंदनासाठी म्हणजे -
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
जन्माला अत्तर घालत म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
तो फाया कानी ठेवू म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू म्हणजे -
खालील कृतींतून सूचित होणारा अर्थ कवितेच्या आधारे लिहा.
| निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती |
सूचित होणारा अर्थ |
|
(१) कोकीळ होऊनी गाऊ... |
____________ |
|
(२) गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू... |
____________ |
पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ.
पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू.
खालील तक्ता पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव | कवीने वापरलेली आनंदाची दोन प्रतीके | भाषिक सौंदर्यस्थळे | कवितेतून मिळणारा संदेश |
'पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ...' या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारे आशयसौंदर्य कवितेच्या आधारे लिहा.
‘डोळ्यांत झऱ्याचे पाणी’ या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून लिहा.
'तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात', अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.
निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.
