Advertisements
Advertisements
Question
इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा.
Advertisements
Solution
इंग्लंडमध्ये, धुसर आणि पांढरे धुके संपूर्ण शहराच्या आकाशाला आच्छादित करतात. लंडनमधले कोळशावर चालणारे हजारो उदयोगधंदे आणि लाखो घरांमधील चुली यामधून रात्रंदिवस धूर निघत असतो, जो वातावरणात मिसळतो. घरात अनवाणी पायाने फिरल्यास पाय काळे होतात, आणि झाडाला स्पर्श केल्यास हात काळे होतात. अशा प्रकारच्या धुरकट वातावरणात धुके पसरले की कोळशाचे बारीक कण दिसतात. काळोख डोळ्यांना दिसतो व हातात धरता येतो. आपल्याला जणू हवेच्या आवरणाच्या तळाशी असल्याचा थेट अनुभव येतो. समुद्राच्या तळाशी असणाऱ्या जीवांच्या घुसमटीची कल्पना येते. ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात, रस्त्यांवर वाहनांचे अपघात होतात. मुले रस्ता चुकतात. अशा प्रकारे तेथील जनजीवन विस्कळीत होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कारणे लिहा.
लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे -
तुलना करा.
| भारतामधील धुके | लंडनमधील धुके |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
| (३) | (३) |
| (४) | (४) |
‘हिवाळ्यातील एक क्षण’ तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.
तुमच्या आवडत्या ॠतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
