English

इ. स. १७४४ ते १७६३ या काळात इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन कर्नाटक युद्धे झाली; कारण ______. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

इ. स. १७४४ ते १७६३ या काळात इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन कर्नाटक युद्धे झाली; कारण ______.

Options

  • या दोन्ही सत्तांना कर्नाटकवर नियंत्रण हवे होते.

  • इंग्रज-फ्रेंच सतत संघर्ष करीत होते.

  • इंग्रज-फ्रेंच दोन्ही सत्तांनी कर्नाटकच्या नवाब घराण्यातील सत्तास्पर्धेत हस्तक्षेप केला.

  • दोन्ही सत्तांना कर्नाटक येथे वखारी स्थापन करावयाच्या होत्या.

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

इ. स. १७४४ ते १७६३ या काळात इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन कर्नाटक युद्धे झाली; कारण इंग्रज-फ्रेंच दोन्ही सत्तांनी कर्नाटकच्या नवाब घराण्यातील सत्तास्पर्धेत हस्तक्षेप केला.

स्पष्टीकरण:

पाँडिचेरी हे फ्रेंचांचे मुख्य ठाणे होते. या प्रदेशावर कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती. हे नवाबपद मिळवण्यासाठी नवाबाच्या घराण्यांत सत्तास्पर्धा सुरू झाली. ब्रिटिश आणि फ्रेंच दोघांनीही यामध्ये हस्तक्षेप सुरू केला. यातूनच इ.स. १७४४ ते १७६३ या काळात इंग्रज-फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली. याला ‘कर्नाटक युद्धे’ म्हणतात. तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचाचा पराभव केला. सत्तास्पर्धेत फ्रेंच नामोहरम झाल्यामुळे भारतात इंग्रजांना प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×