Advertisements
Advertisements
Question
हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही.
Short/Brief Note
Advertisements
Solution
हिमालय पर्वत रांगा हा जगातील एक महत्त्वाचा प्राकृतिक प्रदेश असून सर्वाधिक उंच पर्वत शिखरे याच पर्वतरांगांत आढळतात. हिमालय पर्वतीय प्रदेश हा अतिशय दुर्गम असून वाहतुकीच्या साधनांचा विकास करणे तेथे खूप कठीण जाते. तीव्र उतार, वेगवान वाहणाऱ्या नद्या यांबरोबर भूकंप प्रवण क्षेत्र यामुळे येथील विकासावर मर्यादा पडतात. साहजिकच येथे लोकसंख्येचे वितरणही कमी असून शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधांची उपलब्धताही कमी आहे. एकंदरीतच प्रतिकूल प्राकृतिक घटक आणि कमी विकसित लोकसंख्याविषयक गुणात्मक घटक यांचा एकत्रित परिणाम म्हणून हिमालयातील पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही.
shaalaa.com
लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास
Is there an error in this question or solution?
