मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

हिमालय पर्वत रांगा हा जगातील एक महत्त्वाचा प्राकृतिक प्रदेश असून सर्वाधिक उंच पर्वत शिखरे याच पर्वतरांगांत आढळतात. हिमालय पर्वतीय प्रदेश हा अतिशय दुर्गम असून वाहतुकीच्या साधनांचा विकास करणे तेथे खूप कठीण जाते. तीव्र उतार, वेगवान वाहणाऱ्या नद्या यांबरोबर भूकंप प्रवण क्षेत्र यामुळे येथील विकासावर मर्यादा पडतात. साहजिकच येथे लोकसंख्येचे वितरणही कमी असून शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधांची उपलब्धताही कमी आहे. एकंदरीतच प्रतिकूल प्राकृतिक घटक आणि कमी विकसित लोकसंख्याविषयक गुणात्मक घटक यांचा एकत्रित परिणाम म्हणून हिमालयातील पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही.

shaalaa.com
लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: प्रदेश आणि प्रादेशिक विकास - स्वाध्याय [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकास
स्वाध्याय | Q ४. ३) | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×