Advertisements
Advertisements
Questions
फरक स्पष्ट करा.
विभाजन पद्धत व राशी पद्धत
फरक स्पष्ट करा.
विभाजन पद्धत आणि राशी पद्धत
Distinguish Between
Advertisements
Solution
| अ. क्र. | तुलनेसाठी आधार | विभाजन पद्धत | राशी पद्धत |
| १. | अर्थ | संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लहानात लहान आर्थिक घटकांमध्ये विभाजन करून त्यांचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे वापरली जाणारी पद्धत म्हणजे विभाजन पद्धत होय. | संपूर्ण अर्थव्यवस्थेतील लहानात लहान आर्थिक घटकांच्या बेरजेच्या स्वरूपातील एकूण परिमाणाचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राद्वारे वापरली जाणारी पद्धत म्हणजे राशी पद्धत होय. |
| २. | स्वरूप | आर्थिक चलांच्या व्यक्तिगत परिमाणांच्या अभ्यासासाठी विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. | आर्थिक चलांच्या समुच्चयात्मक परिमाणांच्या अभ्यासासाठी राशी पद्धतीचा वापर केला जातो. |
| ३. | शास्त्राचा प्रकार | ही पद्धत सूक्ष्म अर्थशास्त्रात वापरली जाते. | ही पद्धत स्थूल अर्थशास्त्रात वापरली जाते. |
| ४. | उदाहरणे | वैयक्तिक मागणी, एका उद्योगाचा अभ्यास, विशिष्ट वस्तूची किंमत. | एकूण मागणी, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी. |
shaalaa.com
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये
Is there an error in this question or solution?
