Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
विभाजन पद्धत व राशी पद्धत
फरक स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
| अ. क्र. | विभाजन पद्धत | राशी पद्धत |
| १. | संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लहानात लहान आर्थिक घटकांमध्ये विभाजन करून त्यांचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे वापरली जाणारी पद्धत म्हणजे विभाजन पद्धत होय. | संपूर्ण अर्थव्यवस्थेतील लहानात लहान आर्थिक घटकांच्या बेरजेच्या स्वरूपातील एकूण परिमाणाचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राद्वारे वापरली जाणारी पद्धत म्हणजे राशी पद्धत होय. |
| २. | सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. | स्थूल अर्थशास्त्र राशी पद्धतीचा वापर करते. |
| ३. | हे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्म अवलोकन करते. | हे अर्थव्यवस्थेचे स्थूल अवलोकन करते. |
| ४. | हे कुटुंब संस्था, उत्पादन संस्था, ग्राहक, उत्पादक, वैयक्तिक वेतन, किमती, उत्पन्न, विशिष्ट वस्तू इत्यादी. सारख्या वैयक्तिक घटकांचा तपशीलवार अभ्यास करते. | हे एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, समग्र पुरवठा, समग्र मागणी यांसारख्या समग्रलक्षी घटकांचा अभ्यास करते. |
shaalaa.com
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
