English

एका कृषी क्षेत्रातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5 : 4 आहे. एका कुशल आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 900 रुपये आहे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

एका कृषी क्षेत्रातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5 : 4 आहे. एका कुशल आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 900 रुपये आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा.

Sum
Advertisements

Solution

समजा, कुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार ₹ x इतका व अकुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार ₹ y इतका आहे.

पहिल्या अटीनुसार,

`x/y = 5/4`

∴ 4x = 5y

∴ 4x – 5y = 0   ...(1)

दुसऱ्या अटीनुसार,

x + y = 900   ...(2)

समीकरण (2) ला 5 ने गुणू.

5x + 5y = 4500   ...(3)

समीकरण (1) व (3) यांची बेरीज करू.

4x – 5y =       0   ...(1)
5x + 5y = 4500   ...(3)
9x         = 4500

∴ `x = 4500/9`

∴ x = 500

x = 500 ही किंमत समीकरण (2) मध्ये भरू.

x + y = 900

∴ 500 + y = 900

∴ y = 900 – 500

∴ y = 400

कुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार ₹ 500 आहे.

अकुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार ₹ 400 इतका आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×