Advertisements
Advertisements
प्रश्न
एका कृषी क्षेत्रातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5 : 4 आहे. एका कुशल आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 900 रुपये आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा.
Advertisements
उत्तर
समजा, कुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार ₹ x इतका व अकुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार ₹ y इतका आहे.
पहिल्या अटीनुसार,
`x/y = 5/4`
∴ 4x = 5y
∴ 4x – 5y = 0 ...(1)
दुसऱ्या अटीनुसार,
x + y = 900 ...(2)
समीकरण (2) ला 5 ने गुणू.
5x + 5y = 4500 ...(3)
समीकरण (1) व (3) यांची बेरीज करू.
4x – 5y = 0 ...(1)
5x + 5y = 4500 ...(3)
9x = 4500
∴ `x = 4500/9`
∴ x = 500
x = 500 ही किंमत समीकरण (2) मध्ये भरू.
x + y = 900
∴ 500 + y = 900
∴ y = 900 – 500
∴ y = 400
कुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार ₹ 500 आहे.
अकुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार ₹ 400 इतका आहे.
