Advertisements
Advertisements
Question
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. नावे लिहा. (2)
- गर्दीनं फुललेलं स्टेशन - ______
- अरुणिमाचे गाव - ______
|
दोस्तांनो, मी... अरुणिमा सिन्हा! आज तुम्ही गुगलवर शोधले तर ‘माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय’ असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी! पण एक सांगू? मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही... नव्हते.. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणारेय तुम्हांला... लखनऊपासून २०० किमी. अंतरावर असणारं आंबेडकरनगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाब (मोठ्या बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर ‘आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील’, हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि ‘कॉल लेटर’ आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. ११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. |
2. कारणे लिहा. (2)
- अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते; कारण ______
- अरुणिमाने ‘सीआयएसएफ’ मध्ये नोकरीसाठी अर्ज केला; कारण ______
3. स्वमत (3)
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
Advertisements
Solution
1.
- गर्दीनं फुललेलं स्टेशन - लखनऊ
- अरुणिमाचे गाव - आंबेडकरनगर
2.
- अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते; कारण सीआयएसएफच्या नोकरीसंदर्भातील फॉर्ममध्ये अरुणिमाची जन्मतारीख चुकवलेली असल्याने तो घोळ तिला निस्तरायचा होता.
- अरुणिमाने ‘सीआयएसएफ’ मध्ये नोकरीसाठी अर्ज केला; कारण नोकरी करतानाही तिला खेळांशी जोडलेले राहायचे होते.
3. अरुणिमा ही राष्ट्रीय खेळाडू म्हणून सुप्रसिद्ध होती. अचानकपणे अपघातातून आलेल्या अपंगत्वाने तिचे आयुष्यच बदलून गेले. अशा अवघड प्रसंगी खचून न जाता ती जिद्दीने पेटून उठली. असंख्य अडचणींना सामोरे जात तिने आपले ध्येय साध्य केले. ती शरीराने अपंग झाली; मात्र मनाने कधीच नाही.
अशीच जिद्दी अरुणिमा प्रत्येकात लपलेली असते. ती बाहेर आणण्याकरिता केवळ एका क्षणाची गरज असते. तो क्षण असतो, आपल्याला आपले ध्येय समजण्याचा. ते ध्येय एकदा समजले, की त्या ध्येयापर्यंत वाटचाल करण्याची शक्ती आपोआपच निर्माण होते. त्या ध्येयवेडेपणातून ते ध्येय गाठण्यासाठी आवश्यक धैर्य, साहस, जिद्द, मेहनत या साऱ्यांची तयारी आपोआप होते. मानवाचे ध्येय जेव्हा निश्चित होते तेव्हा तेथपर्यंत पोहोचण्याचा मार्गही त्याला दिसू लागतो. या गोष्टी आपल्यात दडलेल्या असतात. त्यांना केवळ बाहेर काढण्याची गरज असते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.

खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती.
कोण ते लिहा.
सर्वांत मोठा मोटिव्हेटर - ______
कोण ते लिहा.
अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे - ______
कोण ते लिहा.
फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन - ______
अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.
अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.
पाठातून (गोष्ट अरुणिमाची) तुम्हांला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
- ______
- ______
- ______
- ______
- ______
‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’ तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा.
(अ) ______
(आ) ______
(इ) ______
(ई) ______
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) उत्तरे लिहा. (२)
- भाईसाबनी अरुणिमाला दिलेला सल्ला -
- अरुणिमाला या खेळात नॅशनल चॅम्पियनशिप मिळाली -
| (बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर 'आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील', हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि 'कॉल लेटर' आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. ११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतूत मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. 'बस... एवढे कागदपत्रांचे काम झाले, की झालेच आपले पक्के.' अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते; पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी म़ाझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, त्या डब्यातल्या प्रत्येकजण 'अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे', अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयाण अंधारात माझे दोन्ही हात-पाय धरून त्या नराधमांनी मला चक्क गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. 'अरुणिमा, रेल्वे येतेय आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे', हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचेतोवर खूप उशीर झाला होता. |
२) एका शब्दात माहिती लिहा. (१)
i) अरुणिमाचा प्रवास
- प्रवासाचा दिवस-
- स्टेशन व रेल्वेगाडी-
ii) कारण लिहा. (१)
रेल्वेतील प्रवासी मख्ख चेहऱ्याने जागेवर बसून राहिले...
३) स्वमत- (३)
तुमचा ’रेल्वेप्रवासातील एखादा अनुभव“ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) एका शब्दात उत्तरे लिहा. (२)
- अरुणिमाचा निर्धार -
- अरुणिमाचा पहिला टप्पा -
|
माझ्या, एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. 'शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.' अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावारी नेलं; पण माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला 'शक्य आहे' असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. 'एम्स' मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस दिवसेंदिवस अगदी महिनोन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब – आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, ’अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास... तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वत:ला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला...!“ |
२)
1. कोण ते लिहा. (१)
एव्हरेस्ट सर करणारी महिला -
2. खालील कृतीतून व्यक्त होणारा गुण लिहा. (१)
माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले.
३) स्वमत- (३)
’आपल्या आतलं एव्हरेस्ट आपल्यालाच सर करायचे असते“ हे विधान सोदाहरण तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
