English

कोण ते लिहा. सर्वांत मोठा मोटिव्हेटर - ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

कोण ते लिहा.

सर्वांत मोठा मोटिव्हेटर - ______ 

One Word/Term Answer
Advertisements

Solution

सर्वांत मोठा मोटिव्हेटर - स्वतःच 

shaalaa.com
गोष्ट अरुणिमाची
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: गोष्ट अरुणिमाची - कृती [Page 42]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 11 गोष्ट अरुणिमाची
कृती | Q (३) (आ) | Page 42

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.


खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.

उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती.


कोण ते लिहा.

एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला - ______ 


कोण ते लिहा.

फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन - ______


अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.

शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.


अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.

अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.


‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’ तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा.

(अ) ______

(आ) ______ 

(इ) ______

(ई) ______


‘आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.


‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.


तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) उत्तरे लिहा. (२)

  1. भाईसाबनी अरुणिमाला दिलेला सल्ला -
  2. अरुणिमाला या खेळात नॅशनल चॅम्पियनशिप मिळाली -
(बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर 'आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील', हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि 'कॉल लेटर' आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. 
११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतूत मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. 'बस... एवढे कागदपत्रांचे काम झाले, की झालेच आपले पक्के.' अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते; पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी म़ाझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, त्या डब्यातल्या प्रत्येकजण 'अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे', अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयाण अंधारात माझे दोन्ही हात-पाय धरून त्या नराधमांनी मला चक्क गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. 'अरुणिमा, रेल्वे येतेय आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे', हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचेतोवर खूप उशीर झाला होता.

२) एका शब्दात माहिती लिहा. (१)

i) अरुणिमाचा प्रवास

  • प्रवासाचा दिवस-
  • स्टेशन व रेल्वेगाडी-

ii) कारण लिहा. (१)

रेल्वेतील प्रवासी मख्ख चेहऱ्याने जागेवर बसून राहिले...

३) स्वमत-  (३)

तुमचा ’रेल्वेप्रवासातील एखादा अनुभव“ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. नावे लिहा. (2)

  1. गर्दीनं फुललेलं स्टेशन - ______
  2. अरुणिमाचे गाव - ______

            दोस्तांनो, मी... अरुणिमा सिन्हा! आज तुम्ही गुगलवर शोधले तर ‘माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय’ असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी! पण एक सांगू? मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही... नव्हते.. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणारेय तुम्हांला...

            लखनऊपासून २०० किमी. अंतरावर असणारं आंबेडकरनगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाब (मोठ्या बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर ‘आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील’, हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि ‘कॉल लेटर’ आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते.

            ११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली.

2. कारणे लिहा. (2)

  1. अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते; कारण ______
  2. अरुणिमाने ‘सीआयएसएफ’ मध्ये नोकरीसाठी अर्ज केला; कारण ______

3. स्वमत (3)

‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) कृती करा. (2)

            पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. ‘एम्स’ मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस दिवसेंदिवस अगदी महिनाेन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब-आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, ‘‘अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास... तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वत:ला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला...!’’

            ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र’ बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे दीड वर्षांसाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून सुलाखून निघत होते.

(2) एका शब्दात उत्तर लिहा. (2)

  1. एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला.
  2. अरुणिमाबरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती.

(3) स्वमत. (3)

‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×