English

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा: सोहगौडा ताम्रपट: हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तरप्रदेश) येथे सापडला. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा:

सोहगौडा ताम्रपट: हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तरप्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते.
  1. सोहगौडा ताम्रपट कोणत्या काळातील असावा असे मानले जाते? (1)
  2. सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीत आहे? (1)
  3. सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासातील महत्त्व सांगा. (2)
Short Answer
Advertisements

Solution

  1. सोहगौडा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते.
  2. सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे.
  3. सोहगौडा ताम्रपटाचे महत्त्व असे की, त्यावर दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी कोठारांमधील धान्य जपून वापरण्याचा आदेश दिला आहे. हा प्राचीन काळातील प्रशासकीय नियोजनाचा एक महत्त्वाचा पुरावा आहे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×