Advertisements
Advertisements
Question
भौगोलिक कारणे लिहा.
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.
Short/Brief Note
Advertisements
Solution
- भारताचा पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून असून हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनला आहे.
- या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम व पूर्व घाटातून येऊन मिळतात. जमिनीच्या मंद उतारामुळे त्यांचा वेग कमी असतो. त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे किनाऱ्यावर संचयन होऊन नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात, हा किनारा उथळ बनला आहे.
- नैसर्गिक बंदराकरता खोल व दंतूर किनारा हे घटक महत्त्वाचे असतात; मात्र ही भौगोलिक स्थिती पूर्व किनाऱ्यावर आढळत नाही.
परिणामी, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.
shaalaa.com
भारताची प्राकृतिक रचना
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
अरवली पर्वताच्या पायथ्याशी ________.
भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा.
भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती?
टिपा लिहा.
हिमालय
भौगोलिक कारणे लिहा.
भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.
अचूक गट ओळखा:
भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात.
फरक स्पष्ट करा.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेश व ब्रझील मैदानी प्रदेश
विधानावरून प्रकार ओळखा.
भारतातील हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे.
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-
- विंध्य पर्वत कोणत्या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे?
- द्वीपकल्पावरील दक्षिणवाहिनी नदीचे नाव काय आहे?
- अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारांदरम्यान असलेल्या पठारांची नावे लिहा.
- पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा.
- सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते?
