English

'भाषेतील सौंदर्य' या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधून लिहा. उदा., निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

'भाषेतील सौंदर्य' या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधून लिहा.

उदा., निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो.

Short Answer
Advertisements

Solution

  1. अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते.
  2. घराघरांतल्या बायका कोंबड्याच्या बांगेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत, झोपलेल्या जात्याला गायला लावतात.
  3. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त झालेले असते.
  4. थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो.
  5. व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सूरू झालेली असते.
  6. मध्येच एखाद्या ढोलीतून हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुराची भर घालत असतो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: सुरांची जादूगिरी - स्वाध्याय [Page 19]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 5 सुरांची जादूगिरी
स्वाध्याय | Q ८. | Page 19
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×