English

भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणांसह स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणांसह स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

भारतीय द्वीपकल्पीय भागामध्ये भारतातील प्रमुख जलविभाजक आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत.

  • पश्चिम घाट –
  1. भारतीय द्वीपकल्पाच्या भागात पश्चिमेकडील भागात दक्षिणोत्तर पसरलेली पर्वतांची रांग ही पश्चिम घाट म्हणून ओळखली जाते.
  2. या प्रदेशात अनेक पश्चिमवाहिनी नद्या व गोदावरी, कृष्णा, कावेरी इत्यादी पूर्ववाहिनी नद्या उगम पावतात.
  • अरवली पर्वतरांगा –
  1. भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील भागात नैऋत्य-ईशान्य दिशेने अरवली पर्वतरांगा पसरल्या आहेत.
  2. या पर्वतरांगांच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी नैऋत्य दिशेने कच्छच्या रणाकडे वाहत येते, तर बनास ही चंबळ नदीची उपनदी ईशान्य दिशेने वाहत जाते.
    यामुळे, अरवली पर्वतरांगांनादेखील जलविभाजक म्हणता येते.
  • विंध्य पर्वतरांगा: विंध्य पर्वत गंगानदी खोरे व नर्मदा नदी खोरे विलग करते.
  • सातपुडा पर्वतरांग: सातपुडा पर्वतरांग नर्मदा नदी खोरे व तापी नदीचे खोरे विलग करते.
  • हिमालय पर्वतरांगा: हिमालय पर्वतरांगा हिमालयातील काही नद्या व हिमालयापलीकडील रांगांतून वाहणाऱ्या नद्यांना विलग करत असल्याने हिमालय जलविभाजकाची भूमिका बजावतो असे म्हणता येते.
shaalaa.com
भारताची जलप्रणाली
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: प्राकृतिक रचना व जलप्रणाली - स्वाध्याय [Page 23]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वाध्याय | Q २. (उ) | Page 23
SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 5
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×