English

भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

भारत ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य:

  1. दोन्ही देशांच्या अतिउत्तर, मध्य व वायव्य भागात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
  2. भारतातील अतिउत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर या राज्यात व ब्राझीलमधील अतिउत्तरेकडील अमापा राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
  3. भारतातील मध्य भागातील मध्य प्रदेश राज्यात व ब्राझीलमधील मध्य भागातील माटो ग्रासो राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
  4. भारताच्या वायव्य भागातील राजस्थान राज्यातील थरच्या वाळवंटात व ब्राझीलमधील वायव्य भागातील ॲमेझॉनस राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
  5. भारतातील पूर्व व पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात आणि ब्राझीलमध्ये पूर्व किनारपट्टीच्या व प्रामुख्याने आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते.

भारत ब्राझीलया देशांच्या लोकसंख्या वितरणातील फरक:

  1. भारतातील गंगा व इतर नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते. याउलट, ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आढळते.
  2. जनगणना २०११ नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता ३८२ व्यक्ती प्रति चौकिमी होती. याउलट, ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता केवळ २३ व्यक्ती प्रति चौकिमी होती.
shaalaa.com
लोकसंख्या
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: लोकसंख्या - स्वाध्याय [Page 45]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 6 लोकसंख्या
स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 45
SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 6 लोकसंख्या
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×