English

एका गृहस्थाने ₹ 8000 कर्जाऊ घेतले आणि त्यावर ₹ 1360 व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा ₹ 40 कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यांत भरली,

Advertisements
Advertisements

Question

एका गृहस्थाने ₹ 8000 कर्जाऊ घेतले आणि त्यावर ₹ 1360 व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा ₹ 40 कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यांत भरली, तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती होता?

Sum
Advertisements

Solution

हप्ता योजना अंकगणिती श्रेढी आहे.

12 मासिक हप्त्यांत भरलेली रक्कम (S12

= कर्जाऊ रक्कम + व्याज

= 8000 + 1360

∴ S12 = 9360

हप्त्याची संख्या (n) = 12

प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा ₹ 40 ने कमी आहे.

∴ d = - 40

`"S"_"n" = "n"/2`[2a + (n - 1)d]

∴ `"S"_"n" = 12/2`[2a + (12 - 1)(- 40)]

∴ 9360 = 6 [2a + (11)(- 40)]

∴ 9360 = 6 [2a - 440]

∴ `9360/6` = 2a - 440

∴ 1560 = 2a - 440

∴ 1560 + 440 = 2a

∴ 2000 = 2a

∴ a = `2000/2`

∴ a = 1000

∴ tn = a + (n - 1)d

∴ t12 = 1000 + (12 - 1)(- 40)

= 1000 + 11 (- 40)

= 1000 - 440

= 560

∴ पहिला हप्ता ₹ 1000 आणि शेवटचा हप्ता ₹ 560 इतका असेल.

shaalaa.com
अंकगणिती श्रेढीचे उपयोजन (Applications of A. P.)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: अंकगणित श्रेढी - सरावसंच 3.4 [Page 78]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 3 अंकगणित श्रेढी
सरावसंच 3.4 | Q 2 | Page 78

RELATED QUESTIONS

सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये पहिल्या वर्षी ₹ 5000, दुसऱ्या वर्षी ₹ 7000, तिसऱ्या वर्षी ₹ 9000 याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षांतील एकूण गुंतवणूक किती?


अंकगणिती श्रेढीच्या m व्या पदाची m पट ही n व्या पदाच्या n पटीबरोबर असेल, तर त्याचे (m + n) वे पद शून्य असते हे दाखवा. (m ≠ n)


207 या संख्येचे तीन भाग असे करा, की त्या संख्या अंकगणिती श्रेढीत असतील व लहान दोन भागांचा गुणाकार 4623 असेल.


1 ते n नैसर्गिक संख्यांची बेरीज 36 आहे, तर n ची किंमत काढा.


5 ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत?

कृती: –5 ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या 10, 15, 20 ......... 95., ह्या आहेत.

d = 5 असल्याने दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे.

येथे, , a = 10, d = 5, tn = 95, n = ?

tn = a + (n - 1) `square`

`square` = 10 + (n – 1) × 5

`square` = (n –1) × 5

`square` = (n –1)

म्हणून, n = `square`

5 ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या `square` आहेत.


कल्पना दर महिन्याला ठरावीक रक्कम बचत करते. तिने पहिल्या महिन्यात 100रु., दुसऱ्या महिन्यात 150रु., तिसऱ्या महिन्यात 200रु. याप्रमाणे बचत केली, तर किती महिन्यात 1200रु. बचत होईल?

कृती: कल्पनाची मासिक बचत 100 रु., 150 रु., 200 रु. ......... 1200 रु. अशी आहे.

येथे d = 50 रु. आहे. म्हणून, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेढी आहे.

a = 100, d = 50, tn = `square`, n = ?

tn = a + (n – 1) `square`

`square` =100 + (n – 1) × 50

`square/50` = n - 1

n = `square`

म्हणून, 1200 रु. बचत `square` महिन्यात होईल.


मेरीला दरमहा 15000 रु. पगाराची नोकरी मिळाली, जर तिला दरमहा 100 रु. पगारवाढ मिळत असेल, तर 20 महिन्यांनंतर मेरीचा पगार किती होईल?


शर्वरीने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी 2 रु., दुसऱ्या दिवशी ४ रु., व तिसऱ्या दिवशी ६ रु. अशा तर्हेने पैसे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी २०१० या महिन्याची एकूण बचत किती?


3900 रुपये 12 हप्त्याने असे परत केले, की प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपये जास्त होता, तर पहिला व शेवटचा हप्ता किती रुपयांचा होता?


कविताने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये व तिसऱ्या दिवशी 60 रुपये अशा प्रकारे पैसे गुंतविल्यास तिची फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत किती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×