English

4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.

Geometric Constructions
Advertisements

Solution

कच्ची आकृती:

रचनेच्या पायऱ्या:

  1. P हा केंद्रबिंदू घेऊन, 4.1 सेमी त्रिज्येचे एक वर्तुळ काढा.
  2. Q बिंदू असा घ्या की PQ = 7.3 सेमी.
  3. रेख PQ चा लंबदुभाजक काढा. तो रेख PQ ला ज्या बिंदूत छेदेल त्या बिंदूला M हे नाव द्या.
  4. M केंद्र मानून आणि PM एवढी त्रिज्या घेऊन वर्तुळाला R आणि S बिंदूत छेदेल असा कंस काढा.
  5. किरण QR आणि QS काढा. किरण QR आणि QS या वर्तुळाच्या अपेक्षित स्पर्शिका आहेत.

shaalaa.com
दिलेल्या वर्तुळाला त्याबाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे.
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: भौमितिक रचना - सरावसंच 4.2 [Page 99]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 भौमितिक रचना
सरावसंच 4.2 | Q 7. | Page 99

RELATED QUESTIONS

3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा.


3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. बिंदू M व बिंदू N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.


केंद्र O असलेले 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर बिंदू P घ्या. P बिंदूमधून वर्तुळाची स्पर्शिका काढा.


6.4 सेमी व्यासाचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून व्यासाएवढ्या अंतरावर बिंदू R घ्या. या बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढा.


केंद्र P असलेले वर्तुळ काढा. 100° मापाचा एक लघुकंस AB काढा. बिंदू A व बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.


केंद्र E असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर F बिंदू घ्या. बिंदू A असा घ्या, कि E-F-A आणि FA = 4.1 सेमी. बिंदू A मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त ______ स्पर्शिका काढता येतील. 


4.5 सेमी लांबीचा रेख AB काढा. रेख AB चा लंबदुभाजक काढा. 


3.3 सेमी त्रिज्येचे व O केंद्र असलेले वर्तुळ काढून त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा.
किरण OP व किरण OQ काढा.
P मधून किरण OP ला लंब रेषा काढा.
Q मधून किरण OQ ला लंब रेषा काढा.

3.2 सेमी त्रिज्या व 'O' केंद्र असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर कोणताही एक बिंदू P घ्या. वर्तुळकेंद्राचा वापर करून बिंदू P मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×