Advertisements
Advertisements
प्रश्न
4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.
Advertisements
उत्तर
कच्ची आकृती:

रचनेच्या पायऱ्या:
- P हा केंद्रबिंदू घेऊन, 4.1 सेमी त्रिज्येचे एक वर्तुळ काढा.
- Q बिंदू असा घ्या की PQ = 7.3 सेमी.
- रेख PQ चा लंबदुभाजक काढा. तो रेख PQ ला ज्या बिंदूत छेदेल त्या बिंदूला M हे नाव द्या.
- M केंद्र मानून आणि PM एवढी त्रिज्या घेऊन वर्तुळाला R आणि S बिंदूत छेदेल असा कंस काढा.
- किरण QR आणि QS काढा. किरण QR आणि QS या वर्तुळाच्या अपेक्षित स्पर्शिका आहेत.

संबंधित प्रश्न
3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा.
3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. बिंदू M व बिंदू N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
केंद्र O असलेले 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर बिंदू P घ्या. P बिंदूमधून वर्तुळाची स्पर्शिका काढा.
6.4 सेमी व्यासाचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून व्यासाएवढ्या अंतरावर बिंदू R घ्या. या बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढा.
केंद्र P असलेले वर्तुळ काढा. 100° मापाचा एक लघुकंस AB काढा. बिंदू A व बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
केंद्र E असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर F बिंदू घ्या. बिंदू A असा घ्या, कि E-F-A आणि FA = 4.1 सेमी. बिंदू A मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
4.5 सेमी लांबीचा रेख AB काढा. रेख AB चा लंबदुभाजक काढा.
| वर्तुळावर P हा कोणताही एक बिंदू घ्या. किरण OP काढा. |
| ↓ |
| किरण OP ला किरण P मधून लंब रेषा काढा. |
| 3.3 सेमी त्रिज्येचे व O केंद्र असलेले वर्तुळ काढून त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा. |
| ↓ |
| किरण OP व किरण OQ काढा. |
| ↓ |
| P मधून किरण OP ला लंब रेषा काढा. |
| ↓ |
| Q मधून किरण OQ ला लंब रेषा काढा. |
3.2 सेमी त्रिज्या व 'O' केंद्र असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर कोणताही एक बिंदू P घ्या. वर्तुळकेंद्राचा वापर करून बिंदू P मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
