Advertisements
Advertisements
Question
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
(१) आकृती पूर्ण करा: [२]

| तो सगळीकडे जमवून घेणारा माणूस होता. फक्त त्याची एकच अपेक्षा असे, की रात्री निवांत झोपता यावे; पण ते डास तेवढीही इच्छा पुरी होऊ देत नसत. त्याला काय म्हणावे? हा झोपला, की झालीच त्यांची गुणगुण सुरू. संध्याकाळीच खोलीची दारं, खिडक्या बंद ठेवून पाहिली. अंगाला मलम चोपडून, डासांना हटवण्यासाठीची अगरबत्ती जाळून, सगळं करून झालं. डास दाद देईनात. पंखा लावल्यावर मात्र जरा शांतता मिळू लागली; पण त्या ढणढण पंख्याचाही त्रास. अपरात्री जाग यायची. तो पंखा बंद करून टाकायचा. उकडायला लागलं, की दारं, खिडक्या उघडायचा. पंखा सुरू केला, तरी आलेले याचक काय सोडणार होते त्याला? इकडे डास जमातीतही याची चर्चा व्हायची. कसला हा चिंगूस माणूस? |
(२) चौकटी पूर्ण करा: [२]
- पंख्याचा आवाज - ______
- माणसाची अपेक्षा - ______
(३) उत्तरे लिहा: [२]
- सगळीकडे जमवून घेणारा - ------
- डासांनी माणसाला दिलेले विशेषण - ------
Comprehension
Advertisements
Solution

-
- पंख्याचा आवाज - ढणढण
- माणसाची अपेक्षा - रात्री निवांत झोप यावी
-
- सगळीकडे जमवून घेणारा - माणूस
- डासांनी माणसाला दिलेले विशेषण - चिंगूस
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
