English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

(१) आकृती पूर्ण करा: होतं असं, की जहिराचे बूट अगदी जुने, जीर्ण झालेले असतात; पण जहिराला शाळेत बूट घालून जाणं अनिवार्य असल्यामुळं, अली तेच बूट पुन्हा एकदा शिवायला घेऊन जातो. त्याच वेळी आईनं उधारीवर - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

(१) आकृती पूर्ण करा:    [२]

होतं असं, की जहिराचे बूट अगदी जुने, जीर्ण झालेले असतात; पण जहिराला शाळेत बूट घालून जाणं अनिवार्य असल्यामुळं, अली तेच बूट पुन्हा एकदा शिवायला घेऊन जातो. त्याच वेळी आईनं उधारीवर भाजी आणायला सांगितल्यानं जहिराचे बूट दुकानाच्या दर्शनी भागातल्या एका खोबणीत ठेवून अली आत जातो. उधारीवर कांदे, बटाटे मागितल्यानं अलीला अर्थातच दुकानदाराची बोलणी खावी लागतात. बाहेर येतो तर बूट गायब झालेले असतात. कचरा गोळा करणारे लोक ते 'टाकाऊ' बूट गाडीत टाकून देतात.

अलीला कमालीचा धक्का बसतो. घरी आल्यावर घडलेली सर्व हकिकत तो जहिराला सांगतो. आता बूटच नसल्यानं जहिरानं शाळेत जायचं कसं, हा यक्षप्रश्न दोघा भावंडांपुढे उभा राहतो.

(२) 'धक्का' हे उत्तर येईल असा प्रश्‍न तयार करा.    [१]

(३) धावण्याच्या स्पर्धेत तुम्हांला प्रथम क्रमांक मिळाला आहे, अशी कल्पना करून तुमच्या भावना स्पष्ट करा.    [३]

Comprehension
Advertisements

Solution


  1. बूट गायब झाल्यावर अलीला कमालीचा काय बसला?
  2. धावण्याच्या स्पर्धेत मला पहिला क्रमांक मिळाल्यामुळे मी खूप आनंदी झालो. मी रोज पहाटे उठून धावण्याचा नियमित सराव करत होतो. या यशामागे माझे आईवडील, बहिणी आणि माझ्या शिक्षकांचे मोठे योगदान आहे. त्यांनी मनापासून मला मार्गदर्शन व मदत केली. माझ्या मेहनतीचे आज फळ मिळाले. शिक्षकांनी मला शाबासकी दिली आणि मित्रांनी माझे अभिनंदन केले. आईवडिलांच्या आशीर्वादामुळेच हे यश मिळाले. हे संपूर्ण श्रेय मी माझ्या मार्गदर्शकांना देतो. आजचा दिवस माझ्या आयुष्यात सदैव लक्षात राहील, आणि मी विनम्रतेने पुढील यशासाठी सतत प्रयत्नशील राहीन.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×