Revision: वर्गसमीकरणे Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित] SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Maharashtra State Board
- खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण नाही?
- खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण आहे? (A) 5/x - 3 = x^2 (B) x(x + 5) = 2 (c) n − 1 = 2n (d) 1/x^2 (x + 2) = x
- खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा. 2y = 10 − y2
- Kx2 - 10x + 3 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती: kx2 - 10x + 3 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 आहे. ∴ x = □ वरील समीकरणात ठेवू. ∴ k(□)2-10×□+3=0
- जर x = 3 हे kx2 - 10x + 3 = 0 या समीकरणाचे एक मूळ असेल, तर k ची किंमत किती?
- 2m2 - 5m = 0 या वर्गसमीकरणाचे मूळ 2 आहे किंवा नाही ते ठरवा.
- Kx2 − 7x + 12 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 आहे, तर k = ______.
- खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. x2 + x − 20 = 0
- खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. x2 − 15x + 54 = 0
- सूत्राचा उपयोग करून खालील वर्गसमीकरण सोडवा: 3m2 − m − 10 = 0
- खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा. x2 + 10x + 2 = 0
- खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा. y2+13y=2
- वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा: x2 + 2x - 9 = 0 उकल: x2 + 2x - 9 = 0 ची तुलना ax2 + bx + c = 0 शी करून, a = 1, b = 2, c = □ ∴ b2 − 4ac = (2)2 − 4 × □ × □
- (m − 12)x2 + 2(m − 12) x + 2 = 0 या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील, तर m ची किंमत काढा.
- जर 2 आणि 5 ही वर्गसमीकरणाची मुळे आहेत, तर वर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा: कृती: समजा α = 2 आणि β = 5 ही वर्गसमीकरणाची मुळे आहेत. मिळणारे वर्गसमीकरण; x2 − (α + β)x + αβ = 0
- पाच क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 1455 आहे, तर त्या संख्या शोधा.
- एक टाकी दोन नळाच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
- 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक येत असून बाकी 5 येते, तर भागाकार व भाजक किती?