Advertisements
Advertisements
प्रश्न
समलंब चौकोन ABCD मध्ये, बाजू AB || बाजू DC कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूत छेदतात. AB = 20, DC = 6, OB = 15 तर OD काढा.

Advertisements
उत्तर
बाजू AB || बाजू DC व रेख BD ही त्यांची छेदिका आहे. ......[पक्ष]
∴ ∠DBA ≅ ∠BDC .....[व्युत्क्रम कोन]
∴ ∠OBA ≅ ∠ODC ....(i) [D-O-B]
ΔOBA व ΔODC मध्ये,
∠OBA ≅ ∠ODC ......[(i) वरून]
∠BOA ≅ ∠DOC .......[विरुद्ध कोन]
∴ ΔOBA ∼ ΔODC .......[समरूपतेची कोको कसोटी]
∴ `"OB"/"OD" = "AB"/"DC"` .......[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
∴ `15/"OD" = 20/6`
∴ OD = `(15 xx 6)/20`
∴ OD = 4.5 एकक
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती मध्ये ∠ABC = 75°, ∠EDC =75° तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा.

आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये, बाजू PQ || बाजू SR, AR = 5AP, AS = 5AQ तर सिद्ध करा, SR = 5PQ.

आकृती मध्ये रेख PQ || रेख DE, A (Δ PQF) = 20 एकक, जर PF = 2 DP आहे, तर A(`square"DPQE"`) काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
A(Δ PQF) = 20 एकक, PF = 2 DP, DP = x मानू. ∴ PF = 2x
DF = DP + `square` = `square` + `square` = 3x
Δ FDE व Δ FPQ मध्ये
∠ FDE ≅ ∠`square` (संगत कोन)
∠ FED ≅ ∠`square` (संगत कोन)
∴ Δ FDE ∼ Δ FPQ .............(कोको कसोटी)
∴ `("A"(Δ"FDE"))/("A"(Δ"FPQ")) = square/square = ((3"x")^2)/((2"x")^2) = 9/4`
A(Δ FDE) = `9/4` × A(Δ FPQ ) = `9/4 xx square = square`
A(`square` DPQE) = A(Δ FDE) - A(Δ FPQ)
= `square - square`
= `square`

आकृती मध्ये रेख XY || रेख BC तर खालील पैकी कोणते विधान सत्य आहे?

खालीलपैकी कोणती कसोटी समरूपतेची नाही?
आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?

आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण समरूप आहेत का ते ठरवा. असल्यास समरूपता कसोटी लिहा. ∠P = 35°, ∠X = 35° व ∠Q = 60°, ∠Y = 60°

आकृतीमध्ये रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात आणि `"AP"/"PC" = "BP"/"PD"`, तर सिद्ध करा ∆ABP ~ ∆CDP.
आकृतीमध्ये समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ || बाजू SR, AR = 5 AP, तर सिद्ध करा, SR = 5 PQ.
चौकोन ABCD मध्ये बाजू AD || BC, कर्ण AC आणि BD परस्परांना P बिंदूत छेदतात, तर सिद्ध करा, की `"AP"/"PD" = "PC"/"BP".`

