मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विषयावर बातमी तयार करा. जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट येथे “जागतिक महिला दिन” साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विषयावर बातमी तयार करा.

जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट येथे “जागतिक महिला दिन” साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

जनमत

जनता गर्ल्स हायस्कूल येथे “जागतिक महिला दिन” उत्साहात साजरा

दि. ९ मार्च २०२१

वार्ताहर, शेंदूरजना घाट: - तालुक्यातील जनता गर्ल्स हायस्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वदेशी फाउंडेशनच्या फिल्ड ऑफिसर नम्रता शिर्के यांनी महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती दिली व घरगुती मिरची, आंब्याचे लोणचे बनवून त्याची बाजारात कशी विक्री करावी याचे मार्गदर्शन केले. यावेळी बचतगटाच्या ५० महिलांना प्रत्येकी २ किलो मशरूमचे बियाणे मोफत वाटप करण्यात आले. 'महिला सशक्तीकरण' या विषयावर जनता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी एक नाटिका सादर केली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सभापती श्री. अक्षय देशमुख्, सदस्य स्नेहल पाटील, रमेश शिंद्रे आदी उपस्थित होते. जनता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्या विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती देशमुख यांनी 'नारी तु महान, विश्वाची आहेस शान.' अशी घोषणा देऊन साऱ्याचा उत्साह वाढवला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

shaalaa.com
बातमी लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 20.3: उपयोजित लेखन - बातमी लेखन

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
पाठ 20.3 उपयोजित लेखन
बातमी लेखन | Q १.

संबंधित प्रश्‍न

खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.

शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न.

खालील विषयावर बातमी तयार करा.

रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य. (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक.)


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:


पुढील समारंभाची बातमी तयार करा.

शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा.

शाळा ______ कोरोना ______ मोबाइल ______ शिक्षण सुरू ______ अभ्यासक्रम ______समस्या.


पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा.

कोरोना आला नी _____ गाव स्वच्छ झाले.


पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा.

बालिका दिननिमित्त, “बेटी बचाओ! बेटी पढाओ!” या उपक्रमास जिल्ह्यातील अनेक शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.


वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.


कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त, दि. 27 फेब्रुवारी रोजी ‘साधना विद्यालय, रायरी’ या विद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला.

या समारंभाची बातमी तयार करा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

आदर्श विद्यालय

रवीनगर, गडचिरोली

‘विज्ञानदिन सोहळा’

विज्ञानदिनानिमित्त

वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन

उद्घाटक - डॉ. श्री. विजय आफळे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख

सिटी कॉलेज, गडचिरोली

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली.

विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी करून लिहा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे.

खालील मुद्द्यांवरून बातमी तयार करा.

आदर्श शिक्षक पारितोषिक सोहळा

शिक्षक दिनानिमित्त विद्या मंदिर शाळेतर्फे

आदर्श आणि गुणी शिक्षकांचा सत्कार

  • प्रमुख पाहुणे: कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई.
  • स्थळ: विद्या मंदिर शाळा, कात्रज, पुणे.
  • वेळ: दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत
  • दिनांक: ५ सप्टेंबर, २०१७

तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.


खालील विषयावर बातमी तयार करा.

8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ शाळेत ‘माता-पालक मेळावा’ व विविध स्पर्धांचे आयोजन पालकांचा उदंड प्रतिसाद.


खालील विषयावर बातमी तयार करा.

तलाव ओसंडून वाहू लागले. गावकऱ्यांसाठी आनंदवार्ता.


खालील विषयावर बातमी तयार करा.

शहरात डेंग्यूचा वाढता फैलाव म. न. पा. कडून आरोग्य तपासणी.


खालील विषयावर बातमी तयार करा.

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा.


खालील विषयावर बातमी तयार कराः

‘ज्ञानज्योत विद्यालय’, वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.


खालील विषयावर बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, सोलापूर
शालांत परीक्षेस बसलेल्या विदयार्थ्यांसाठी
'शुभेच्छा समारंभ'

दि. 25 फेब्रुवारी,  वेळ - ११:०० वा.

अध्यक्ष : मां. श्री. विजय जोशी

प्रमुख पाहुणे - मां. श्री. विशाल साठे (समाजसेवक)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×