मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील विषयावर बातमी तयार करा. शहरात डेंग्यूचा वाढता फैलाव म. न. पा. कडून आरोग्य तपासणी.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयावर बातमी तयार करा.

शहरात डेंग्यूचा वाढता फैलाव म. न. पा. कडून आरोग्य तपासणी.

लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

डेंग्यूपासून बचाव करण्यात मनपाचा पुढाकार,
शहराची आरोग्य तपासणी झाली सुरू

(आमच्या वार्ताहराकडून)

दिनांक: १२ सप्टेंबर

डोंबिवली, दि. ११ सप्टेंबर - दिवसेंदिवस डेंग्यूच्या रोग्यांमध्ये वाढ होत चालली आहे. महानगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेतला आहे. आरोग्य तपासणी शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. डॉक्टर व नर्सेस डेंग्यूच्या उपचारासाठी सज्ज आहेत. पावसाळ्यात डेंग्यूचा फैलाव वाढत असतो. शहरातील नागरिकांत भिती पसरली आहे. मनपाने जनजागृतीसाठी पाऊल उचलले आहे. डेंग्यूसाठी करायच्या चाचण्या महाग असतात. आरोग्य तपासणी शिबिरांत या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. नागरिकांना काही औषधेही कमी दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. डेंग्यू आजारातील आहारासंदर्भात सविस्तर माहिती शिबिरातील डॉक्टरांकडून दिली जाणार आहे. डेंग्यू आजारातील आहारासंदर्भात सविस्तर माहिती शिबिरातील डॉक्टरांकडून दिली जाणार आहे. डेंग्यूचा नवीन रुग्ण आढळल्यास आरोग्य तपासणी शिबिरात तातडीने विशेष तपासणी केली जाणार आहे; असे मनपा आरोग्य विभागाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

shaalaa.com
बातमी लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15: उपयोजित लेखन - बातमी लेखन [पृष्ठ ४९]

APPEARS IN

बालभारती Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 15 उपयोजित लेखन
बातमी लेखन | Q (२) | पृष्ठ ४९

संबंधित प्रश्‍न

खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.

शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न.

पुढील विषयावर बातमी तयार करा.

जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट येथे “जागतिक महिला दिन” साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.


पुढील समारंभाची बातमी तयार करा.

शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा.

शाळा ______ कोरोना ______ मोबाइल ______ शिक्षण सुरू ______ अभ्यासक्रम ______समस्या.


पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा.

कोरोना आला नी _____ गाव स्वच्छ झाले.


वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.


कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त, दि. 27 फेब्रुवारी रोजी ‘साधना विद्यालय, रायरी’ या विद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला.

या समारंभाची बातमी तयार करा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे.

तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.


खालील विषयावर बातमी तयार करा.

8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ शाळेत ‘माता-पालक मेळावा’ व विविध स्पर्धांचे आयोजन पालकांचा उदंड प्रतिसाद.


खालील विषयावर बातमी तयार करा.

तलाव ओसंडून वाहू लागले. गावकऱ्यांसाठी आनंदवार्ता.


खालील विषयावर बातमी तयार करा:

जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा.

प्रमुख पाहुणे - ज्येष्ठ साहित्यिक - श्री. अरविंद मोरे

अध्यक्ष - श्री. सागर शिंदे

दि. 27 फेब्रुवारी वेळ - स. 10.00


खालील विषयावर बातमी तयार कराः

‘ज्ञानज्योत विद्यालय’, वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.


खालील विषयावर बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, सोलापूर
शालांत परीक्षेस बसलेल्या विदयार्थ्यांसाठी
'शुभेच्छा समारंभ'

दि. 25 फेब्रुवारी,  वेळ - ११:०० वा.

अध्यक्ष : मां. श्री. विजय जोशी

प्रमुख पाहुणे - मां. श्री. विशाल साठे (समाजसेवक)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×