Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर बातमी तयार कराः
‘ज्ञानज्योत विद्यालय’, वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.
Advertisements
उत्तर
ज्ञानज्योत विद्यालयात स्वातंत्र्यदिन दिमाखात साजरा
वर्धा, दि. १६ ऑगस्ट : वर्धा येथील ‘ज्ञानज्योत विद्यालय’ ही एक प्रतिष्ठित शाळा असून येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ प्रा. डॉ. नंदिनी देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. शाळेच्या बॅण्ड पथकाने त्यांचे आगमन होताच सन्मानपूर्वक मानवंदना दिली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीते सादर करून उपस्थितांना भारावून टाकले.
या प्रसंगी डॉ. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन यांचे महत्त्व पटवून दिले. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी, असे त्यांनी आवर्जून सांगितले. याच वेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन या विषयावर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले. त्यांच्या सशक्त अभिनयामुळे पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली. या पथनाट्याचे उपस्थित शिक्षक, पालक आणि पाहुण्यांनी विशेष कौतुक केले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.
| शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न. |
खालील विषयावर बातमी तयार करा.
रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य. (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक.)
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:

पुढील विषयावर बातमी तयार करा.
जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट येथे “जागतिक महिला दिन” साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.
पुढील समारंभाची बातमी तयार करा.
शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.
कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त, दि. 27 फेब्रुवारी रोजी ‘साधना विद्यालय, रायरी’ या विद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला.
या समारंभाची बातमी तयार करा.
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.
| अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे. |
खालील मुद्द्यांवरून बातमी तयार करा.
|
आदर्श शिक्षक पारितोषिक सोहळा शिक्षक दिनानिमित्त विद्या मंदिर शाळेतर्फे आदर्श आणि गुणी शिक्षकांचा सत्कार
|
तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.
खालील विषयावर बातमी तयार करा.
तलाव ओसंडून वाहू लागले. गावकऱ्यांसाठी आनंदवार्ता.
खालील विषयावर बातमी तयार करा.
शहरात डेंग्यूचा वाढता फैलाव म. न. पा. कडून आरोग्य तपासणी.
खालील विषयावर बातमी तयार करा.
सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा.
खालील विषयावर बातमी तयार करा:
जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा.
प्रमुख पाहुणे - ज्येष्ठ साहित्यिक - श्री. अरविंद मोरे
अध्यक्ष - श्री. सागर शिंदे
दि. 27 फेब्रुवारी वेळ - स. 10.00
