मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एक गाडी विशिष्ट अंतर एकाच ठरावीक वेगाने कापते. जर गाडीचा वेग 6 कि.मी/तास वाढला असता, तर ती तिच्या निर्धारित वेळेच्या 4 तास लवकर पोहोचते. जर गाडीचा वेग 6 किमी/तास कमी झाला असता, तर गाडीला तिच्या

Advertisements
Advertisements

प्रश्न

एक गाडी विशिष्ट अंतर एकाच ठरावीक वेगाने कापते. जर गाडीचा वेग 6 कि.मी/तास वाढला असता, तर ती तिच्या निर्धारित वेळेच्या 4 तास लवकर पोहोचते. जर गाडीचा वेग 6 किमी/तास कमी झाला असता, तर गाडीला तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 6 तास जास्त लागतील, तर गाडीने एकूण किती किमी प्रवास केला?

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा, आगगाडीचा वेग ताशी x किमी आहे.

समजा, विशिष्ट अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ y तास आहे.

आपणांस माहीत आहे, की वेग × वेळ = अंतर 

∴ अंतर = xy किमी

पहिल्या अटीनुसार, जर गाडीचा वेग 6 किमी प्रति तास वाढला असता, तर ती तिच्या निर्धारित वेळेच्या 4 तास लवकर पोहोचते.

∴ (x + 6) (y – 4) = xy

∴ xy – 4x + 6y – 24 = xy

∴ – 4x + 6y – 24 = 0

∴ 2x – 3y = –12 …(i)

दुसऱ्या अटीनुसार, जर गाडीचा वेग 6 किमी प्रति तास कमी झाला असता, तर गाडीला तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 6 तास जास्त लागतील.

∴ (x – 6) (y + 6) = xy

∴ xy + 6x – 6y – 36 = xy

∴ 6x – 6y – 36 = 0

∴ x – y = 6 …(ii)

दोन्ही बाजूंना 2 ने गुणून,

2x – 2y = 12 …(iii)

समीकरण (i) मधून समीकरण (iii) वजा करून,

2x - 3y = -12
2x - 2y = 12
-    +      -    
      -y = -24

∴ y = 24

y = 24 ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवून,

x – 24 = 6

∴ x = 30

∴ गाडीने एकूण किमी केलेला प्रवास = xy = 30 × 24 = 720 किमी

shaalaa.com
एकसामयिक समीकरणांचे उपयोजन (Application of simultaneous equations)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: दोन चलातील रेषीय समीकरणे - Q.४

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bijganit (Ganit 1) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1 दोन चलातील रेषीय समीकरणे
Q.४ | Q ४.

संबंधित प्रश्‍न

दोन संख्यांमधील फरक ३ असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज १९ आहे, तर त्या संख्या शोधा.


वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची वये काढा.


मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा.


एका सरळ रस्त्यावर A आणि B ही दोन ठिकाणे आहेत. त्यांतील अंतर ३० किमी आहे. हमीद मोटारसायकलने A पासून B च्या दिशेने जाण्यास निघतो. त्याच वेळी जोसेफ मोटारसायकलने B पासून A च्या दिशेने जाण्यास निघतो. ते दोघे २० मिनिटांत एकमेकांना भेटतात. जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता, तर त्याला हमीद तीन तासांनी भेटला असता, तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता?


एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. त्या आयताची परिमिती 52 सेमी असल्यास आयताची लांबी किती?


एक व्यक्ती एका निश्चित पगार आणि दरवर्षी ठरावीक वेतनवाढ या अटींवर नोकरी सुरू करते. 4 वर्षांनी त्या व्यक्तीचा पगार रुपये 15000 आणि 10 वर्षांनी पगार रुपये 18000 असल्यास त्या व्यक्तीचा मूळ पगार आणि वेतनवाढ काढा.


सोडवा. 0.4x + 0.3y = 1.7; 0.7x – 0.2y = 0.8.


मी 75 ही संख्या मनात धरली, त्या संख्येच्या दोन्ही अंकांतील संबंध दर्शवणारी अट लिहा. मूळ संख्या आणि अंकांची अदलाबदल करून येणाऱ्या संख्येतील संबंध दर्शवणारी अट लिहा.


मी स्टेशनवरून घरी जाण्यासाठी एक रिक्षा ठरवली. पहिल्या किलोमीटरसाठी रुपये x आणि पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी रुपये y रुपये ठरले. दहा किलोमीटर गेल्यावर 40 रुपये झाले व 16 किलोमीटर गेल्यावर 58 रुपये झाले, तर पहिल्या किलोमीटरला किती भाडे होते?


एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 24 सेमी आहे. एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 सेमीने कमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×