मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

मी पुस्तक बोलत आहे...

         “नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताय ना? अहो, मी तुमचा मित्र 'पुस्तकराव' बोलतोय. तसे माझे आणि तुमचे नाते अगदी बालपणापासूनचे! माझ्याद्वारे तुम्ही गाणी, गोष्टी शिकता. तालासुरात कविता म्हणायला व घडाघडा पाठ वाचायलाही शिकता. माझ्यातील रंगीत, बोलकी चित्रे पाहून किती आनंद मिळतो तुम्हांला! खरंच, तुमच्या दिवसाची सुरुवात माझ्या वाचनाने होते, हे पाहून मला खूप आनंद होतो. मला माझ्याजवळ असलेला माहितीचा, ज्ञानाचा खजिना तुम्हांला उलगडवून दाखवता येतो. तुमचा एखादा कंटाळवाणा, थकलेला क्षण माझ्या संगतीने मनोरंजक बनू शकतो. तुम्हांला एखाद्या वेगळ्याच विश्वात घेऊन जाताना मी तुमचा वाटाड्या बनू शकतो. ज्ञान, विज्ञान, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांशी तुमची भेट घालून देण्याचे भाग्य मला लाभते. त्यामुळे, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो.

         झाडापासून कागदनिर्मिती होईपर्यंत, अगदी पुस्तक बांधणी ते पुस्तक प्रकाशित करण्यापर्यंतचा हा प्रवास मी अनुभवलेला असतो. हजारो हातांनी मेहनत केलेली असते, मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी! कागदनिर्मिती करणाऱ्या सामान्य मजूर, कारागिरांपासून लेखक, प्रकाशक यांचा माझ्या निर्मितीमागे मोलाचा वाटा असतो. या सर्वांच्या मेहनतीची जाणीव नसल्यामुळेच काही लोक माझा नीट वापर करत नाहीत. कव्हर्स घालणे तर दूरच; पण काही खाता-पिताना माझ्यावर डाग पाडतात. माझी पाने दुमडतात. मला निष्काळजीपणे हाताळल्यामुळे मी फाटतो. काहीजण तर मला उशीसारखे डोक्याखाली घेऊन झोपतात. असे हे बेजबाबदार वागणे मला अजिबात आवडत नाही. अतिशय दु:ख होते.

         मला तुम्हां सर्व मुलांना असे सांगावेसे वाटते, की 'ज्ञानमेव परा शक्ति:'। ज्ञान हीच सर्वोत्तम शक्ती आहे. हे ज्ञान आमच्यात वास करते. त्यामुळे, मला हाताळताना थोडीशी काळजी घेतलीत, तर मला खूप आनंद होईल. मी चांगल्या स्थितीत राहीन व इतरांनाही उपयोगी पडेन.

         सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मीही डिजिटल होत आहे. मला मोबाइलमध्ये, संगणकावर 'इ-बुक'च्या स्वरूपात वाचता येते. माझ्या या काळानुसार बदलत्या रूपाची भुरळ तुमच्या नव्या पिढीला पडत आहे. तुमचा वाचनाचा छंद कायम टिकावा, हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे, तुम्हांला काहीतरी सांगण्याची, तुमच्यासाठी काही करण्याची, तुमच्या जवळ राहण्याची माझी इच्छा पूर्ण होईल आणि आपली मैत्री सदैव टिकून राहील.

         अच्छा, खूप वेळ झाला, अभ्यास करा बरं …“

shaalaa.com
निबंध लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2019-2020 (March) Official

संबंधित प्रश्‍न

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

पहाटेचे सौंदर्य.


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

तंत्रज्ञानाची किमया.


नमुना कृती.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

मी रेडिओ बोलतोय


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

फाटक्या पुस्तकाचे मनोगत


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

सैनिकाचे मनोगत


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

आरोग्य हीच संपत्ती


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.

वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×