Definitions [10]
व्याख्या लिहा.
नाभीय अंतर
भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यांमधील अंतर म्हणजे नाभीय अंतर होय.
व्याख्या लिहा.
मुख्य नाभी
भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाशकिरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावरील एका बिंदूवर अभिसारित होतात किंवा अशाप्रकारे अपसारित होतात, की जणू काही ते मुख्य अक्षावरील बिंदूपासून बाहेर पडत आहेत. या बिंदूला भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात.
व्याख्या लिहा.
भिंगाचा मुख्य अक्ष
भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रांतून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष होय.
व्याख्या लिहा.
भिंगाचे प्रकाशीय केंद्र
प्रकाशकिरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात.
व्याख्या लिहा.
भिंगाचे वक्रता केंद्र
भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे, त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात.
व्याख्या लिहा.
विशालन
भिंगामुळे होणारे विशालन हे प्रतिमेच्या उंचीचे (h2) वस्तूच्या उंचीशी (h1) असणारे गुणोत्तर होय.
व्याख्या लिहा.
दृष्टीचे अधिकतम अंतर
निरोगी डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर म्हणतात.
व्याख्या लिहा.
दृष्टीचे लघुतम अंतर
निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुतम अंतर म्हणतात.
व्याख्या लिहा.
समायोजन शक्ती
नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती म्हणतात.
व्याख्या लिहा.
दृष्टिसातत्य
आपल्या डोळ्यांसमोरून वस्तू दूर केल्यानंतरही 1/16 सेकंदापर्यंत प्रतिमेचा दृष्टिपटलावर परिणाम तसाच राहतो. काही काळ दृष्टिपटलावरील संवेदना टिकते, या परिणामाला दृष्टिसातत्य म्हणतात.
Important Questions [11]
- खालील आकृतीचे निरीक्षण करून किरणांची नावे लिहा: किरण AB, किरण CD, किरण GH.
- बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा. 1. 2F1 च्या पलीकडे _______ 2. ________ अनंत अंतरावर _________ 3. ____________ वास्तव, उलट व वस्तुपेक्षा मोठ
- 20 सेमी नाभीय अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती ______ आहे.
- एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 सेमी आहे. तर त्या भिंगाची शक्ती किती असेल?
- बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेमी आहे, तर भिंगाची शक्ती ______ आहे.
- शास्त्रीय कारणे लिहा. डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही.
- नाव लिहा. नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.
- साध्या सुक्ष्मदर्शीमध्ये ______ भिंगाचा वापर करतात.
- खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा: आकृती → मुद्दे ↓ (अ) दोषाचे नाव ______ ______ (ब) प्रतिमेचे स्थान ______ ______ (क) दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले भिंग ______ ______
- आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा: वरील आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा दृष्टिदोष दर्शविलेला आहे? हा दृष्टिदोष निर्माण होण्याची कारणे कोणती?
- शास्त्रीय कारणे लिहा. घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात.
Concepts [16]
- भिंगे (Lenses)
- अपवर्तित किरणांचे रेखन
- भिंगांसाठी चिन्ह संकेत
- भिंगाचे सूत्र (Lens formula)
- विशालन (Magnification - M)
- भिंगाची शक्ती (Power of a lens)
- भिंगांचा संयोग (Combination of lenses)
- मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
- दृष्टिदोष व त्यावरील उपाय (Defects of vision and their corrections)
- लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता (Nearsightedness/ Myopia)
- दूरदृष्टिता (Farsightedness/Hypermetropia)
- वृद्ध दृष्टिता (Presbyopia)
- वस्तूचा आभासी आकार (Apparant size of object)
- अंतर्गोल भिंगांचे उपयोग (Use of concave lenses)
- बहिर्गोल भिंगांचे उपयोग (Use of convex lenses)
- दृष्टिसातत्य (Persistance of vision)
