हिंदी

संत ज्ञानेश्वरांच्या 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच

Advertisements
Advertisements

प्रश्न

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. एका शब्दात उत्तर लिहा. (२)

  1. मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना म्हणजे. 
  2. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला ग्रंथ.
संत ज्ञानेश्वरांच्या 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते; परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली. संत ज्ञानेश्वर 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते, तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, ’’आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात. तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा“, यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, ’’मी देवापाशी आधी मागितले आहे. ते, म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी.“ संत निवृत्तीनाथ म्हणाले, ’’ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा.“ यातून पसायदान निर्माण झाले. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात. त्यांचा दाखला देत, 'आपणही गुण्यागोविंदाने राहावे', हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले.

2. कोष्टक पूर्ण करा. (२)

3. स्वमत. (३) 

निसर्गातील सर्व घटकाप्रमाणे माणसाने पण गुण्यागोविंदाने राहण्यासाठी प्रत्येकाने काय केले पाहिजे असे तुम्हांला वाटते.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

1.

  1. पसायदान
  2. ज्ञानेश्वरी

2.

निसर्गातील कोणकोणते घटक एकत्र राहतात
फुले वृक्ष निर्झर नद्या

3. निसर्गातील सर्व घटक एकोप्याने राहतात, म्हणून निसर्गाची कार्ये हजारो वर्षे अविरतपणे सुरू आहेत. माणसाने निसर्गातील इतर घटकांकडून बोध घेऊन एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहण्याची, तसेच निसर्गातील इतर घटकांशी योग्यप्रकारे वागण्याची गरज आहे. आपण श्रेष्ठ आहोत ही भावना नाहीशी झाली, तर इतरांबद्दल आपल्या मनात प्रेम, दया, सहकार्य करण्याची वृत्ती निर्माण होईल. धर्म, जात, वंश, देश, राज्य या विविध कारणांमुळे होणारा भेदभाव नष्ट होईल. एकमेकांना मदत करून मानवी कल्याण साधण्याचा प्रयत्न केला गेला, तर संत ज्ञानेश्वरांची 'हे विश्वचि माझे घर' ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होईल.

shaalaa.com
सर्व विश्वचि व्हावे सुखी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी - कृती क्रमांक २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
अध्याय 20.1 सर्व विश्वचि व्हावे सुखी
कृती क्रमांक २ | Q 1. (अ)

संबंधित प्रश्न

खालील चौकट पूर्ण करा.

संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना - ______ 


खालील चौकट पूर्ण करा.

मानवी सुखदु:खाशी सहृदयतेने समरस होणे - ______ 


खालील चौकट पूर्ण करा.

‘सर्वांभूती भगवद्भावो’ अशी प्रार्थना करणारे संत - ______ 


खालील चौकट पूर्ण करा.

सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत - ______ 


खालील चौकट पूर्ण करा.

संत तुकारामांचे जीवनसूत्र - ______


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


फरक सांगा.

सामान्य माणसाचे मागणे  संतांचे मागणे
(अ) (अ)
(आ) (आ)

खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा.

जे खळांची व्यंकटी सांडो - ______ 


खालील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा. 

(नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य) 

अ. क्र. काव्यांश संतांचे नाव काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा/भावना
(१) ‘सर्व विश्वचि व्हावे सुखी’ ______ ______
(२) ‘अहंकाराचा वारा न लागो राजसां’ ______ ______
(३) ‘सर्वांभूती भगवद्भावो’ ______ ______
(४) ‘एक एका साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ’ ______ ______
(५) ‘स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने’ ______ ______

सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.


‘भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


या पाठातून (सर्व विश्वचि व्हावे सुखी) तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (२)

१) ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा जपायचा असेल तर _____________

  1. माणसाने एकमेकांशी अजिबात बोलले नाही पाहिजे.
  2. मन सुसंस्कृत असायला हवे.
  3. दररोज एकमेकांच्या घरी जावे.
  4. विज्ञानाची मदत घ्यावी.

२) जगण्याचे खरे सूत्र ___________

  1. स्वत: चांगले जगावे.
  2. शेजारी सांगितले तसे जगावे.
  3. कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जगावे.
  4. सगळ्यांना सावली देत जगावे.
           आजच्या विज्ञानयुगात विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात 'हे विश्वचि माझे घर आहे,' ही कल्पना केली होती याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो; पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे. नाहीतर, राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात; पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे.
           वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. झाडे स्वत: ऊन सोसतात. लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वत: चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसर्याचाही विचार करावा; असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल. सुखी होईल.

2. पुढील घटकांची प्रत्येकी दोन वैशिष्ट्ये लिहा. (२)

  1. झाडे -
  2. पर्वत -

3. स्वमत. (३)

वरील उताऱ्याच्या आधारे विज्ञान हवा की निसर्ग, का ते थोडक्यात स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×