हिंदी

SCERT Maharashtra solutions for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 20.1 - सर्व विश्वचि व्हावे सुखी [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 20.1 - सर्व विश्वचि व्हावे सुखी - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी

Below listed, you can find solutions for Chapter 20.1 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.


कृती क्रमांक १कृती क्रमांक २कृती क्रमांक ३
कृती क्रमांक १

SCERT Maharashtra solutions for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 20.1 सर्व विश्वचि व्हावे सुखी कृती क्रमांक १

गुण (७)

1. (अ)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. खालील आकृती पूर्ण करा. (२)

जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
i. संतांच्या साहित्याचा आत्मा महाराष्ट्र
ii. संतांची भूमी विश्वकल्याण
iii. सर्व संतांच्या मागणीतील एकमेव गोष्ट मानवता
iv. सर्व संतांच्या प्रार्थनेतील आविष्कार भक्ती व समाजप्रबोधन, समाजकल्याण
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति। देह कष्टविती परउपकारें।' ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वत:साठी काहीही मागत नाहीत; परंतु 'बुडतां हे जन न देखवे डोळां। येतो कळवळा म्हणउनि।।' यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरुनानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरूंकडे साकडे घातले आहे. संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक काळातील संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे, कारण 'मी' पासून 'आम्ही' या संकल्पनेप्रमाणे 'अवघे विश्वचि माझे घर', 'वसुधैव कुटुम्बकम्' या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा 'विश्वकल्याण' याचा परिचय या पाठातून करून घेऊया.

2. एका वाक्यात उत्तर लिहा. (२)

  1. विश्वकल्याण कधी शक्य आहे?
  2. संतांच्या साहित्यातून प्रकट झालेल्या संकल्पना सांगा.

3. स्वमत. (३)

'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति। देह कष्टविती परउपकारें' या चरणाचा अर्थ उदाहरणांसह स्पष्ट करा.

कृती क्रमांक २

SCERT Maharashtra solutions for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 20.1 सर्व विश्वचि व्हावे सुखी कृती क्रमांक २

गुण (७)

1. (अ)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. एका शब्दात उत्तर लिहा. (२)

  1. मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना म्हणजे. 
  2. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला ग्रंथ.
संत ज्ञानेश्वरांच्या 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते; परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली. संत ज्ञानेश्वर 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते, तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, ’’आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात. तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा“, यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, ’’मी देवापाशी आधी मागितले आहे. ते, म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी.“ संत निवृत्तीनाथ म्हणाले, ’’ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा.“ यातून पसायदान निर्माण झाले. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात. त्यांचा दाखला देत, 'आपणही गुण्यागोविंदाने राहावे', हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले.

2. कोष्टक पूर्ण करा. (२)

3. स्वमत. (३) 

निसर्गातील सर्व घटकाप्रमाणे माणसाने पण गुण्यागोविंदाने राहण्यासाठी प्रत्येकाने काय केले पाहिजे असे तुम्हांला वाटते.

कृती क्रमांक ३

SCERT Maharashtra solutions for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 20.1 सर्व विश्वचि व्हावे सुखी कृती क्रमांक ३

गुण (७)

1. (अ)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (२)

१) ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा जपायचा असेल तर _____________

  1. माणसाने एकमेकांशी अजिबात बोलले नाही पाहिजे.
  2. मन सुसंस्कृत असायला हवे.
  3. दररोज एकमेकांच्या घरी जावे.
  4. विज्ञानाची मदत घ्यावी.

२) जगण्याचे खरे सूत्र ___________

  1. स्वत: चांगले जगावे.
  2. शेजारी सांगितले तसे जगावे.
  3. कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जगावे.
  4. सगळ्यांना सावली देत जगावे.
           आजच्या विज्ञानयुगात विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात 'हे विश्वचि माझे घर आहे,' ही कल्पना केली होती याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो; पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे. नाहीतर, राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात; पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे.
           वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. झाडे स्वत: ऊन सोसतात. लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वत: चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसर्याचाही विचार करावा; असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल. सुखी होईल.

2. पुढील घटकांची प्रत्येकी दोन वैशिष्ट्ये लिहा. (२)

  1. झाडे -
  2. पर्वत -

3. स्वमत. (३)

वरील उताऱ्याच्या आधारे विज्ञान हवा की निसर्ग, का ते थोडक्यात स्पष्ट करा.

Solutions for 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी

कृती क्रमांक १कृती क्रमांक २कृती क्रमांक ३
SCERT Maharashtra solutions for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 20.1 - सर्व विश्वचि व्हावे सुखी - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 20.1 - सर्व विश्वचि व्हावे सुखी

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 20.1 (सर्व विश्वचि व्हावे सुखी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 20.1 सर्व विश्वचि व्हावे सुखी are सर्व विश्वचि व्हावे सुखी.

Using SCERT Maharashtra मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions सर्व विश्वचि व्हावे सुखी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 20.1, सर्व विश्वचि व्हावे सुखी मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×