हिंदी

सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

उदरनिर्वाहासाठी करण्यात येणाऱ्या शेतीला उदरनिर्वाह शेती म्हणतात. उदरनिर्वाह शेती केल्या जाणाऱ्या प्रदेशात शेत जमिनीचा आकार लहान असतो. त्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जातो. ही शेती प्रामुख्याने उदरनिर्वाहासाठी केली जात असल्यामुळे साहजिकच तेथे अन्नधान्याच्या उत्पादनास प्राधान्य दिले जाते. लोकसंख्येचा दबाव जास्त आणि शेत जमिनीचा आकार लहान यामुळे मानवी श्रम आणि प्राण्यांचा जास्त वापर केला जातो. त्या तुलनेत यांत्रिकीकरण या शेतीत अतिशय अभावाने आढळते. उष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने मान्सून हवामान क्षेत्रात, आग्नेय आशियातील जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशात सखोल उदरनिर्वाह शेती प्रामुख्याने केंद्रित झाली आहे. भारत, जपान, कोरिया, श्रीलंका इत्यादी विविध देशात सखोल निर्वाह शेती आढळते. शेती प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने केली जाते. तांदूळ हे सखोल उदरनिर्वाह शेतीमधील प्रमुख पीक आहे.

shaalaa.com
प्राथमिक व्यवसाय - शेती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: प्राथमिक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 4 प्राथमिक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ६. २) | पृष्ठ ४१

संबंधित प्रश्न

विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये ______.


सांगड घालून साखळी पूर्ण करा:

‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ ‘क’ स्तंभ
सखोल उदरनिर्वाह शेती डॉगर बँक शेतीचा आकार लहान
पंपाज गवताळ प्रदेश किनाऱ्यापासून दूर, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन प्रतिकूल परिस्थिती
मत्स्यक्षेत्र तांदूळ बॉम्बे हाय
फळे, कंदमुळे गोळा करणे घनदाट वने ईशान्य अटलांटिक महासागर
खाणकाम व्यापारी पशुपालन दक्षिण अमेरिका

मळ्याची शेती


भौगोलिक कारणे दया.

भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.


विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.


फरक सांगा.

मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती.


मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा.


शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची २०१८ सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे. त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

खंड प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्येची टक्केवारी (सन २०१८)
युरोप ७.९१
आशिया २४.४९
उत्तर अमेरिका १४.९३
दक्षिण अमेरिका १४.९४
आफ्रिका ४७.२८
ऑस्ट्रेलिया २७.७९

संदर्भ स्रोत: FAO- २०१८

  1. कोणत्या खंडात १०% पेक्षा कमी लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?
  2. कोणत्या खंडात ४०% पेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?
  3. दिलेल्या आकडेवारीकडे बघता, या खंडांना तिथल्या आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढत्या क्रमाने लावता येईल काय?

विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×