हिंदी

खालील शीर्षकावरून कथालेखन करा. ऐकावे जनाचे करावे मनाचे

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

ऐकावे जनाचे करावे मनाचे

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

ऐकावे जनाचे करावे मनाचे

माणगांवात एक कुंभार आणि त्याचा मुलगा राहत होता. त्यांच्याकडे एक गाढव होते. एकदा ते आपल्या गाढवाला घेऊन बाजाराला जात होते. गाढव पुढे चालत होते आणि त्याच्यामागे बाप लेक चालले होते. उन्हाळयाचे दिवस असल्याने पायाला चटके बसत होते. एवढ्यात समोरून काही लोक चालत येताना दिसले. ते कुंभार आणि त्याच्या मुलाकडे पाहून म्हणाले, “काय फायदा गाढव असून? मुलाला एवढ्या उन्हात चालतच घेऊन जातोय हा कुंभार.” कुंभाराने ते ऐकले आणि मुलाला गाढवावर बसवले. थोडे अंतर चालून गेल्यावर काही लोक पारावर बसलेले दिसले. कुंभार तिथून जाऊ लागताच त्यातील एक जण ओरडला, “काय दिवस आले आहेत, मुलगा मजेत गाढवावर बसला आहे आणि म्हातारा बाप रस्त्याने चालतोय.”

मुलगा पटकन खाली उतरला. त्याला खूप वाईट वाटले. त्याने आपल्या बाबांना गाढवावर बसायला सांगितले. थोड्याच अंतरावर पुन्हा काही लोक भेटले. त्यांनी कुंभाराला जोराने ओरडून म्हटले, “अरे काही लाज आहे की नाही? मुलगा पायी चालतोय आणि तू आरामात गाढवावर बसून जातोस.” कुंभार मुलाला म्हणाला, “बाळ, तू पण ये, गाढवावर आपण दोघेही बसू.” त्याप्रमाणे दोघेही गाढवावर बसून पुढे जाऊ लागले. पुढे जात असताना अजून एक माणूस त्यांना भेटला. त्याने कुंभाराला थांबवले आणि त्याच्या अंगावर खेकसला, “तुम्ही मुक्या जनावरांची काळजी कधी घेणार? दोघे दोघे त्याच्या पाठीवर बसून त्या गाढवाचा जीव घेणार का?” कुंभाराला वाटले आपले चुकलेच. ते दोघे गाढवावरून उतरले आणि दोघांनी त्या गाढवालाच आपल्या खांद्यावर घेतले. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे बघून फिदीफिदी हसत होते आणि माणूस कोण अन् गाढव कोण कसं ओळखायचं? असे म्हणत होते. शेवटी कुंभाराने गाढवाला खाली उतरवले आणि तो त्याच्यामागे मुलासह चालू लागला. यापुढे लोक काय म्हणतात हे ऐकून घेतले तरी वागताना मात्र आपल्याला काय वाटते, त्याप्रमाणेच आचरण करायचा निर्धार करून तो पुढच्या प्रवासाला लागला.

तात्पर्य: ऐकावे जनाचे; पण करावे मात्र मनाला जे योग्य वाटते तेच.

shaalaa.com
कथालेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 20.3: उपयोजित लेखन - कथालेखन

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 20.3 उपयोजित लेखन
कथालेखन | Q आ. २.
एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Kumarbharti (Second Language) [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 16.3 उपयोजित लेखन
कथालेखन ४ | Q आ. २.

संबंधित प्रश्न

खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.

दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी! पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला. ‘जिजी...मी आलो ग!’ खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि ....

खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.

आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगळणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

लक्ष्मण नावाचा तरुण----कैदेत----गावप्रमुखाचे कैदखान्याचे निरीक्षण करणे----लक्ष्मणची सुटकेसाठीची विनंती----सुटका व आर्थिक मदत----लक्ष्मण पक्षी घेऊन बाजारात----सर्व पक्षी पिंजऱ्यासहित विकत घेणे----पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह----पक्ष्यांची पिंजऱ्यातून मुक्तता----मुक्ततेचा आनंद----बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

गरीब शेतकरी ______ कोरडवाहू जमीन ______ कठोर परिश्रम ______ शेतीत नवनवीन प्रयोग ______ उत्पन्नात भरभराट ______ यशस्विता ______ आनंद ______ इतरांना मार्गदर्शन ______ राष्ट्रीय पुरस्कार ______ बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

जंगलातील वृक्ष ______ चिमणीचे जोडपे ______ गुण्यागोविंदाने राहाणे ______ हत्तीचा धुमाकूळ पिले मारणे ______ चिमणा-चिमणीचा आक्रोश ______ सुतार पक्ष्याचा सल्ला व प्रेरणा ______ हत्तीची समजूत ______ बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

मार्च २०२० ______ परीक्षा कालावधी ______ विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी ______ कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव ______ सामाजिक परिस्थिती ______ विद्यार्थ्यांची निराशा ______ निकाल ______ बोध.


खालील कथालेखन करा.

महेंद्र नावाचा विद्यार्थी ______ हलाखीची परिस्थिती ______ रानात रोपट्यांचा शेंडा तुटलेला पाहाणे ______ मनात विचार ______ आत्मज्योत जागृत होणे ______ प्रयत्नांची पराकाष्ठा ______ यशस्विता ______ लेखक म्हणून प्रसिद्धी.


खालील कथालेखन करा.

रतन नावाचा तरुण ______ साधारण जीवनशैली ______ अडगळीतील वस्तू _____ कल्पनाशक्तीचा वापर ______ जोडणी ______ शेतीसाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती ______ उपयोग ______ राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.


खालील कथालेखन करा.

रोहिणी नावाची मुलगी ______ कुटुंबात तिघी बहिणी ______ परिस्थिती सर्वसाधारण ______ रोहिणी हुशार ______ तिघींची जिद्द ______ शिक्षणाबरोबर शेतीकाम ______ मोठे स्वप्न ______ स्वप्न साकार _____ त्यांची पोलीस अधीक्षक, शिक्षिका व सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती.


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

नंदुरबारच्या खर्डी या आदिवासी गावात रिंकी नावाची मुलगी दगड-मातीतून धावायची. सात भावंडांमध्ये पाचव्या नंबरची मुलगी होती. घरी कोरडवाहू शेती होती. त्यामुळे, तिच्या आई-वडिलांना इतरांच्या शेतात काम करणे व उन्हाळयाच्या दिवसात मजुरीसाठी गावाबाहेर पडावे लागायचे. सर्व भावंडे मात्र घरीच असायची. यातच मोठ्या भावाला पळण्याचे वेड असल्याने तो पळण्यात तरबेज झाला. पुढे जाऊन त्याने स्पर्धेत भाग घेतला. या धावण्याच्या वेडामुळेच पुढे जाऊन त्याला वनरक्षक होण्याचं भाग्य लाभलं. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन रिंकीसुद्धा धावू लागली आणि...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

एका गावात रामकृष्ण आणि शेवंता नावाचं सामान्य परिस्थितीतील कुटुंब राहत होतं. त्यांना राकेश व प्रांजल नावाची दोन अपत्ये हाती. राकेश आणि प्रांजल दोघेही हुशार आणि आज्ञाधारक होती. अचानक सहा वर्षांची असतानाच प्रांजलची दृष्टी गेली. आईवडिलांना धक्का बसला; पण ते डगमगले नाहीत. त्यांनी तिचा शिक्षणाकडे असलेला ओढा, तिची जिद्द आणि चिकाटी पाहून तिला अंध मुलांच्या शाळेत घातले. तिची अभ्यासातील हुशारी, शिकण्याचा वेग, चिकाटी आणि मेहनत घेण्याची अभिलाषा पाहून शिक्षकांनीही तिची सर्वतोपरी मदत केली आणि पुढे ती...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

रमणलाल नावाच्या व्यापाऱ्याला तीन मुले होती. व्यापाराचा चांगला जम असल्यामुळे रमणलालची परिस्थिती अतिशय उत्तम होती. मुलांमध्ये मात्र नेहमी वाद-विवाद आणि भांडणं होत त्याला तो कंटाळला. त्याने एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून सांगितले की, माझं आता वय झाल्यामुळे यापुढे व्यापार तुम्ही बघावा. पण आधी मी तुमची परीक्षा घेईन त्यात जो पास होईल त्याच्या हातात मी व्यापार देईल. त्याने तिघा मुलांना सारखे पैसे वाटले आणि...


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

एकीचे बळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कष्टाची गोड फळे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

बुद्धी आणि ताकदीचा मेळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

पळसाला पाने तीनच


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कोल्ह्याला द्राक्ष आंबट


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

अति तिथं माती


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

विज्ञानाची कास धरा


खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा:

एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे – पाकिटाच्या मालकास आनंद – बक्षीस.


खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा.

मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू – प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका – उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी – एक खराब झालेला आंबा – दोन दिवसांनी पाहणी – नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब – संदेश –


खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.

हट्टी राजकन्या त्याला अर्धे राज्य मिळते
`↓` `↑`
राज्यकन्येची अट शेतकऱ्याचा मुलगा येतो
`↓` `↑`
न संपणारी गोष्ट सांगणे बरेच जण प्रयत्न करतात
`↓` `↑`
राज्यात दवंडी अर्धे राज्य

खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचाराने व कल्पनेने कथा पूर्ण करा.

आज शाळेमध्येखो खोच्या संघाचे आंतरशालेय सामने सुरू होणार होते. सकाळी ७ वाजताच शाळेचा सर्व संघ मैदानावर हजर होता. सर्वांच्याच मनात उत्सुकता, उत्साह, चैतन्य संचारले होते. सलीम आमच्या संघाचा कर्णधार मात्र अजून यायचा होता. आम्ही सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. सलीम अजून का येत नाही म्हणून चिंतीतही होतो. पंचांनी दोन्ही संघांना मैदानात पाचारण केले. संघात कुजबुज सुरू झाली आणि तेवढ्यात धापा टाकत सलीम मैदानावर आला आणि...

तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व कथेचे तात्पर्य लिहा.


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.

प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि.....
  • तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या.
  • कथा तयार करताना व लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या? ते लिहा.

पुढील मुद्दयांवरुन कथालेखन करा.

मुद्दे - एक राजा - त्याची प्रजा आळशी होती - त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो - रस्त्यात मधोमध दगड ठेवतो - त्यांच्याखाली - सोन्याची नाणी असलेली पिशवी - अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत - एक गरीब माणूस तो उचलतो - पिशवीतील नाणी त्याला मिळतात - लोकांना हे कळते - लोक उद्योगी बनतात -


खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा:

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)

शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटीबसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि ........................................


खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

एक कोल्हा - भूक लागते - द्राक्षांची बाग - खाण्याची इच्छा - द्राक्षांचा वेल उंच - उड्या मारतो - थकतो - आंबट द्राक्षे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×