Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा:
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)
शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटीबसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि ........................................
Advertisements
उत्तर
शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटीबसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि त्या बसच्या रांगेत उभ्या राहिल्या. आज सिटीबस यायला नेहमीपेक्षा उशीर होत होता. ठरलेली वेळ उलटून गेली होती, तरी बसचे काहीच चिन्ह दिसत नव्हते. अचानक नेहाच्या मागे उभ्या असलेल्या आजी चक्कर येऊन खाली कोसळल्या आणि बेशुद्ध पडल्या. हे पाहताच श्रेयाने पटकन आपल्या दप्तरातील पाण्याची बाटली काढून त्यांच्या अंगावर पाणी शिंपडले व त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. नेहाने आजींचे डोके हलक्या हाताने आपल्या मांडीवर ठेवले आणि त्यांना वारा घालू लागली.
हा प्रसंग पाहण्यासाठी आसपासच्या लोकांची गर्दी जमू लागली. तेवढ्यात सिटीबस तेथे येऊन थांबली. नेहा आणि श्रेयाने बसचालकाला आजींची अवस्था समजावून सांगितली. आजींना तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज आहे, हे लक्षात येताच बसचालक व वाहकाने इतर प्रवाशांच्या मदतीने आजींना बसमध्ये चढवले आणि बस थेट रुग्णालयाकडे वळवली.
बसमध्ये नेहा व श्रेया सतत आजींची काळजी घेत होत्या. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले. डॉक्टरांनी सांगितले की, उपचारास थोडाही उशीर झाला असता तर आजींचा जीव धोक्यात आला असता. या दोघी मुलींनी वेळेवर प्रसंगावधान राखून मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सर्व प्रवाशांनी त्यांच्या धाडसाचे मनापासून कौतुक केले. ही घटना आजींच्या कुटुंबीयांना समजताच, नेहा व श्रेया या देवदूतांसारख्या मुलींनी आपल्या आईचे प्राण वाचवले म्हणून त्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
तात्पर्य: अडचणीच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून तत्काळ मदत करणे हेच खरे मानवतेचे लक्षण आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.
| मैत्री → | दप्तर → | गृहपाठ → | रस्ता |
खालील कथालेखन करा.
रतन नावाचा तरुण ______ साधारण जीवनशैली ______ अडगळीतील वस्तू _____ कल्पनाशक्तीचा वापर ______ जोडणी ______ शेतीसाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती ______ उपयोग ______ राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.
खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.
रमणलाल नावाच्या व्यापाऱ्याला तीन मुले होती. व्यापाराचा चांगला जम असल्यामुळे रमणलालची परिस्थिती अतिशय उत्तम होती. मुलांमध्ये मात्र नेहमी वाद-विवाद आणि भांडणं होत त्याला तो कंटाळला. त्याने एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून सांगितले की, माझं आता वय झाल्यामुळे यापुढे व्यापार तुम्ही बघावा. पण आधी मी तुमची परीक्षा घेईन त्यात जो पास होईल त्याच्या हातात मी व्यापार देईल. त्याने तिघा मुलांना सारखे पैसे वाटले आणि...
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
ऐकावे जनाचे करावे मनाचे
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
कष्टाची गोड फळे
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
कोल्ह्याला द्राक्ष आंबट
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज
खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा:
एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे – पाकिटाच्या मालकास आनंद – बक्षीस.
खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा.
मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू – प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका – उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी – एक खराब झालेला आंबा – दोन दिवसांनी पाहणी – नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब – संदेश –
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
आटपाट नगर - वृद्ध शेतकरी - आंब्याची रोपे - बागेत काम - राजा हिंडत बागेत - राजाची चौकशी - रोपे लावून फळे केव्हा - शेतकऱ्याचे उत्तर ऐकून राजाला आश्चर्य - शेतकऱ्याला बक्षीस.
खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.
| हट्टी राजकन्या | त्याला अर्धे राज्य मिळते |
| `↓` | `↑` |
| राज्यकन्येची अट | शेतकऱ्याचा मुलगा येतो |
| `↓` | `↑` |
| न संपणारी गोष्ट सांगणे | बरेच जण प्रयत्न करतात |
| `↓` | `↑` |
| राज्यात दवंडी अर्धे राज्य | |
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
मुद्दे: अनाथ मुलगा – रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप – दुपारी शाळेत – रस्त्यात एक पाकीट मिळते – वर्गशिक्षकांकडे देणे – पाकिटावरील पत्यावरून योग्य व्यक्तिपर्यंत पोहोचवणे – मालकाला आनंद – शाबासकी – मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे.
खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा.
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)
पाडळी गावातील सखू आपल्या रानातला भाजीपाला घेऊन बाजाराला गेली. शेतातल्या कोवळ्या, ताज्या भाज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलेच नाही. अजूनही थोडी भाजी शिल्लक होती. भाव कमी करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा करून लगबगीने घराकडे निघाली. अर्ध्यारस्त्यात जाईपर्यंत काळोख दाटून आला. एक हुरहूर तिच्या मनात दाटून आली; पण नेटाने ती चालत होती. पावले भरभर उचलत होती. एवढ्यात तिला काळोखात सायकलचा आवाज आला. ती थबकली आणि ......................
तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या याची यादी करा.
पुढील मुद्दयांवरुन कथालेखन करा.
मुद्दे - एक राजा - त्याची प्रजा आळशी होती - त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो - रस्त्यात मधोमध दगड ठेवतो - त्यांच्याखाली - सोन्याची नाणी असलेली पिशवी - अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत - एक गरीब माणूस तो उचलतो - पिशवीतील नाणी त्याला मिळतात - लोकांना हे कळते - लोक उद्योगी बनतात -
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
एक कोल्हा - भूक लागते - द्राक्षांची बाग - खाण्याची इच्छा - द्राक्षांचा वेल उंच - उड्या मारतो - थकतो - आंबट द्राक्षे.
