हिंदी

महेंद्र नावाचा विद्यार्थी ______ हलाखीची परिस्थिती ______ रानात रोपट्यांचा शेंडा तुटलेला पाहाणे ______ मनात विचार ______ आत्मज्योत जागृत होणे ______ प्रयत्नांची पराकाष्ठा ______

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कथालेखन करा.

महेंद्र नावाचा विद्यार्थी ______ हलाखीची परिस्थिती ______ रानात रोपट्यांचा शेंडा तुटलेला पाहाणे ______ मनात विचार ______ आत्मज्योत जागृत होणे ______ प्रयत्नांची पराकाष्ठा ______ यशस्विता ______ लेखक म्हणून प्रसिद्धी.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

मेहनतीचे फळ

माणगांव नावाच्या खेड्यात एका गरीब कुटुंबात महेंद्रचा जन्म झाला. आपल्या विद्यार्थिदशेत त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. दोन वेळचे जेवण मिळणे देखील कठीण होते. गरिबीचे चटके असह्य होऊन निराशेच्या भरात तो एकदा जंगलात निघून गेला. मनात विचार येत होते, की कधीच घरी परत जायचे नाही. चालून चालून थकल्यामुळे एका झाडाखाली तो बसला. इकडे तिकडे पाहत असताना त्याने काही रोपट्यांचा शेंडा तुटलेला पाहिला. त्याच्या मनात चटकन काहीतरी विचार चमकला. झाडाचा शेंडा तुटलेला आहे; पण झाड अजूनही जिवंत आहे. नव्या फांद्यांनी, पानांनी ते बहरत आहे. त्याने हार मानलेली नाही. लढण्याची वृत्ती आपण दाखवली, तर आपणही असेच झाडासारखे ताठ मानेने जगू शकतो. हे विचार मनात येताच तो उठला.

महेंद्र जंगलातून परतला, तो एक सकारात्मक विचार मनात घेऊन. त्याची आत्मज्योत जागृत झाली होती. त्याने मनाशी ठरवले आता रडायचे नाही, तर लढायचे. घरकाम करून रात्रशाळेत जात त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महाविद्यालयात शिकत असतानाच त्याला लेखनाचा छंद लागला. तो लिहू लागला. त्याचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. लोकांकडून कौतुक होऊ लागले. त्याच्या पुस्तकांचा खप वाढला. त्याला लेखक म्हणून प्रसिद्धी मिळाली आणि त्याचे नाव यशस्वी लेखकांमध्ये घेतले जाऊ लागले.

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मोडून पडलो तरीही उभे राहण्याचे धाडस त्या जंगलातील शेंडे तुटलेल्या रोपट्यांकडून महेंद्र शिकला आणि त्याने आपले जीवन यशस्वी करण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.

तात्पर्य: परिस्थिती वर मात करून विजय मिळवणे.

shaalaa.com
कथालेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 20.3: उपयोजित लेखन - कथालेखन

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 20.3 उपयोजित लेखन
कथालेखन | Q आ. १.
एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Kumarbharti (Second Language) [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 16.3 उपयोजित लेखन
कथालेखन २ | Q आ. १.

संबंधित प्रश्न

खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.

मैत्री  → दप्तर  → गृहपाठ  → रस्ता

खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.

आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगळणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

लक्ष्मण नावाचा तरुण----कैदेत----गावप्रमुखाचे कैदखान्याचे निरीक्षण करणे----लक्ष्मणची सुटकेसाठीची विनंती----सुटका व आर्थिक मदत----लक्ष्मण पक्षी घेऊन बाजारात----सर्व पक्षी पिंजऱ्यासहित विकत घेणे----पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह----पक्ष्यांची पिंजऱ्यातून मुक्तता----मुक्ततेचा आनंद----बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

गरीब शेतकरी ______ कोरडवाहू जमीन ______ कठोर परिश्रम ______ शेतीत नवनवीन प्रयोग ______ उत्पन्नात भरभराट ______ यशस्विता ______ आनंद ______ इतरांना मार्गदर्शन ______ राष्ट्रीय पुरस्कार ______ बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

जंगलातील वृक्ष ______ चिमणीचे जोडपे ______ गुण्यागोविंदाने राहाणे ______ हत्तीचा धुमाकूळ पिले मारणे ______ चिमणा-चिमणीचा आक्रोश ______ सुतार पक्ष्याचा सल्ला व प्रेरणा ______ हत्तीची समजूत ______ बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

मार्च २०२० ______ परीक्षा कालावधी ______ विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी ______ कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव ______ सामाजिक परिस्थिती ______ विद्यार्थ्यांची निराशा ______ निकाल ______ बोध.


खालील कथालेखन करा.

रोहिणी नावाची मुलगी ______ कुटुंबात तिघी बहिणी ______ परिस्थिती सर्वसाधारण ______ रोहिणी हुशार ______ तिघींची जिद्द ______ शिक्षणाबरोबर शेतीकाम ______ मोठे स्वप्न ______ स्वप्न साकार _____ त्यांची पोलीस अधीक्षक, शिक्षिका व सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती.


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

आदिवासी समाजात असणाऱ्या राजू नावाच्या मुलाला शिक्षणाची आवड असल्याने तो रानावनात झाडांच्या खोडांवर जमिनीवर अक्षरे गिरवायला शिकला. त्याची ती शिक्षणाची ओढ पाहून आई-वडिलांना आश्चर्य वाटत असे. असेच एकदा क्षेत्रभेटीसाठी सुहास नावाचे गुरुजी विद्यार्थ्यांना घेऊन त्या भागात आले. त्यांनी राजूची अभिलाषा ओळखली आणि त्याच्या आई-वडिलांची परवानगी घेऊन राजूला आपल्या शाळेत दाखल केले आणि...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

नंदुरबारच्या खर्डी या आदिवासी गावात रिंकी नावाची मुलगी दगड-मातीतून धावायची. सात भावंडांमध्ये पाचव्या नंबरची मुलगी होती. घरी कोरडवाहू शेती होती. त्यामुळे, तिच्या आई-वडिलांना इतरांच्या शेतात काम करणे व उन्हाळयाच्या दिवसात मजुरीसाठी गावाबाहेर पडावे लागायचे. सर्व भावंडे मात्र घरीच असायची. यातच मोठ्या भावाला पळण्याचे वेड असल्याने तो पळण्यात तरबेज झाला. पुढे जाऊन त्याने स्पर्धेत भाग घेतला. या धावण्याच्या वेडामुळेच पुढे जाऊन त्याला वनरक्षक होण्याचं भाग्य लाभलं. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन रिंकीसुद्धा धावू लागली आणि...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

रमणलाल नावाच्या व्यापाऱ्याला तीन मुले होती. व्यापाराचा चांगला जम असल्यामुळे रमणलालची परिस्थिती अतिशय उत्तम होती. मुलांमध्ये मात्र नेहमी वाद-विवाद आणि भांडणं होत त्याला तो कंटाळला. त्याने एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून सांगितले की, माझं आता वय झाल्यामुळे यापुढे व्यापार तुम्ही बघावा. पण आधी मी तुमची परीक्षा घेईन त्यात जो पास होईल त्याच्या हातात मी व्यापार देईल. त्याने तिघा मुलांना सारखे पैसे वाटले आणि...


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

ऐकावे जनाचे करावे मनाचे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कष्टाची गोड फळे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

प्रामाणिकपणाचे फळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कोल्ह्याला द्राक्ष आंबट


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

अति तिथं माती


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

विज्ञानाची कास धरा


खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा:

एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे – पाकिटाच्या मालकास आनंद – बक्षीस.


खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा.

मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू – प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका – उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी – एक खराब झालेला आंबा – दोन दिवसांनी पाहणी – नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब – संदेश –


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमचा विचार व कल्पकतेने ती कथा पूर्ण करा.

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.) 

तळेगाव गावात गोविंद नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची थोडीफार शेती होती व शेतीसाठी दोन बैलही त्याच्यापाशी होते. एक ढवळ्या व दुसरा पवळ्या अशी त्यांची नावे होती. त्यांची चांगली मैत्री होती. शेतात काम करायला ते एकत्र जात व एकत्रच परत येत पण एके दिवशी ________

खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.

हट्टी राजकन्या त्याला अर्धे राज्य मिळते
`↓` `↑`
राज्यकन्येची अट शेतकऱ्याचा मुलगा येतो
`↓` `↑`
न संपणारी गोष्ट सांगणे बरेच जण प्रयत्न करतात
`↓` `↑`
राज्यात दवंडी अर्धे राज्य

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

मुद्दे: अनाथ मुलगा – रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप – दुपारी शाळेत – रस्त्यात एक पाकीट मिळते – वर्गशिक्षकांकडे देणे – पाकिटावरील पत्यावरून योग्य व्यक्तिपर्यंत पोहोचवणे – मालकाला आनंद – शाबासकी – मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे.


खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा.

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)

पाडळी गावातील सखू आपल्या रानातला भाजीपाला घेऊन बाजाराला गेली. शेतातल्या कोवळ्या, ताज्या भाज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलेच नाही. अजूनही थोडी भाजी शिल्लक होती. भाव कमी करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा करून लगबगीने घराकडे निघाली. अर्ध्यारस्त्यात जाईपर्यंत काळोख दाटून आला. एक हुरहूर तिच्या मनात दाटून आली; पण नेटाने ती चालत होती. पावले भरभर उचलत होती. एवढ्यात तिला काळोखात सायकलचा आवाज आला. ती थबकली आणि ......................


दिलेल्या कथेचा शेवट वाचा व त्याच्या आधारे कथेची सुरुवात लिहा.

........................................................................................................................
........................................................................................................................
........................................................................................................................
................ शेतकरीण आणलेल्या पाण्याचा थेंब नि थेंब जपायची, उपयोगात आणायची. बादलीभर पाण्यात भाजी धुऊन घ्यायची. त्याच पाण्याने घासलेल्या भांड्यांची पहिली राख धुऊन टाकायची, खरकटी भांडी विसळायची, मळकट हात धुवायची, मग बादलीतले पाणी वाफ्यात ओतायची. वाफ्यातल्या भाज्या, फुलझाडे बहरून यायची. हिरवी माया फुलली, भोळ्याभाबड्या शेतकरणीने चतुरपणाने पाण्याचा थेंब नि थेंब जपला होता.


पुढील मुद्दयांवरुन कथालेखन करा.

मुद्दे - एक राजा - त्याची प्रजा आळशी होती - त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो - रस्त्यात मधोमध दगड ठेवतो - त्यांच्याखाली - सोन्याची नाणी असलेली पिशवी - अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत - एक गरीब माणूस तो उचलतो - पिशवीतील नाणी त्याला मिळतात - लोकांना हे कळते - लोक उद्योगी बनतात -


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×