हिंदी

खालील शीर्षकावरून कथालेखन करा. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे

पावसाळयाचे दिवस सुरू होते. दोन दिवस खूप पाऊस पडत होता. त्या पावसातच बळीराम नावाचा एक गाडीवान बैलगाडीत बसून दुसऱ्या गावी निघाला होता. आधीच मातीचा खडकाळ रस्ता, आता पावसामुळे चिखलाने भरून गेला होता. मोठ्या कष्टानेच बळीराम गाडी हाकत होता. जाता जाता त्याची बैलगाडी चिखलात रुतली. बैलांनी खूप जोर लावला; पण व्यर्थ! बैल खालीच बसले.

बळीराम मोठ्याने रडू लागला. “मला कोणीतरी मदत करा हो! माझी गाडी चिखलात रुतली. आता मी काय करू? मी पुढे कसा जाऊ? देवा! माझी गाडी चिखलातून वर काढ. मी तुझ्यापुढं नारळ फोडीन.”

खूप वेळ गेला. जंगलातून जाणाऱ्या त्या वाटेवरून कोणीही येत-जात नव्हते. तो तसाच बसून होता. अखेर आकाशवाणी झाली. “अरे आळशी माणसा, रडून काय होणार? उठ, बैलांना हाक दे! तू स्वत: गाडीची चाकं वर काढण्याचा प्रयत्न कर. मी आळशी आणि रडणाऱ्या माणसांना मदत करत नसतो. मला धाडसी व कष्टाळू माणसं आवडतात.”

बळीरामाने डोळे पुसले. तो बैलांना हाक मारायला लागला. स्वत: गाडीची चाके वर काढण्याचा प्रयत्न करू लागला. सगळी शक्ती एकवटून त्याने जोर लावला आणि आश्चर्य म्हणजे क्षणात त्याची गाडी चिखलातून बाहेर आली.

बळीरामला खूप आनंद झाला! त्याने देवाचे आभार मानले व तो पुढच्या प्रवासाला निघाला.

तात्पर्य: प्रयत्न केल्यावरच कोणतीही गोष्ट प्राप्त होते.

shaalaa.com
कथालेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 20.3: उपयोजित लेखन - कथालेखन

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 20.3 उपयोजित लेखन
कथालेखन | Q आ. ९.
एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Kumarbharti (Second Language) [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 16.3 उपयोजित लेखन
कथालेखन ४ | Q आ. ९.

संबंधित प्रश्न

खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.

दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी! पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला. ‘जिजी...मी आलो ग!’ खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि ....

खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.

मैत्री  → दप्तर  → गृहपाठ  → रस्ता

खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

गरीब शेतकरी ______ कोरडवाहू जमीन ______ कठोर परिश्रम ______ शेतीत नवनवीन प्रयोग ______ उत्पन्नात भरभराट ______ यशस्विता ______ आनंद ______ इतरांना मार्गदर्शन ______ राष्ट्रीय पुरस्कार ______ बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

जंगलातील वृक्ष ______ चिमणीचे जोडपे ______ गुण्यागोविंदाने राहाणे ______ हत्तीचा धुमाकूळ पिले मारणे ______ चिमणा-चिमणीचा आक्रोश ______ सुतार पक्ष्याचा सल्ला व प्रेरणा ______ हत्तीची समजूत ______ बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

मार्च २०२० ______ परीक्षा कालावधी ______ विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी ______ कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव ______ सामाजिक परिस्थिती ______ विद्यार्थ्यांची निराशा ______ निकाल ______ बोध.


खालील कथालेखन करा.

महेंद्र नावाचा विद्यार्थी ______ हलाखीची परिस्थिती ______ रानात रोपट्यांचा शेंडा तुटलेला पाहाणे ______ मनात विचार ______ आत्मज्योत जागृत होणे ______ प्रयत्नांची पराकाष्ठा ______ यशस्विता ______ लेखक म्हणून प्रसिद्धी.


खालील कथालेखन करा.

रतन नावाचा तरुण ______ साधारण जीवनशैली ______ अडगळीतील वस्तू _____ कल्पनाशक्तीचा वापर ______ जोडणी ______ शेतीसाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती ______ उपयोग ______ राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.


खालील कथालेखन करा.

रोहिणी नावाची मुलगी ______ कुटुंबात तिघी बहिणी ______ परिस्थिती सर्वसाधारण ______ रोहिणी हुशार ______ तिघींची जिद्द ______ शिक्षणाबरोबर शेतीकाम ______ मोठे स्वप्न ______ स्वप्न साकार _____ त्यांची पोलीस अधीक्षक, शिक्षिका व सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती.


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

नंदुरबारच्या खर्डी या आदिवासी गावात रिंकी नावाची मुलगी दगड-मातीतून धावायची. सात भावंडांमध्ये पाचव्या नंबरची मुलगी होती. घरी कोरडवाहू शेती होती. त्यामुळे, तिच्या आई-वडिलांना इतरांच्या शेतात काम करणे व उन्हाळयाच्या दिवसात मजुरीसाठी गावाबाहेर पडावे लागायचे. सर्व भावंडे मात्र घरीच असायची. यातच मोठ्या भावाला पळण्याचे वेड असल्याने तो पळण्यात तरबेज झाला. पुढे जाऊन त्याने स्पर्धेत भाग घेतला. या धावण्याच्या वेडामुळेच पुढे जाऊन त्याला वनरक्षक होण्याचं भाग्य लाभलं. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन रिंकीसुद्धा धावू लागली आणि...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

एका गावात रामकृष्ण आणि शेवंता नावाचं सामान्य परिस्थितीतील कुटुंब राहत होतं. त्यांना राकेश व प्रांजल नावाची दोन अपत्ये हाती. राकेश आणि प्रांजल दोघेही हुशार आणि आज्ञाधारक होती. अचानक सहा वर्षांची असतानाच प्रांजलची दृष्टी गेली. आईवडिलांना धक्का बसला; पण ते डगमगले नाहीत. त्यांनी तिचा शिक्षणाकडे असलेला ओढा, तिची जिद्द आणि चिकाटी पाहून तिला अंध मुलांच्या शाळेत घातले. तिची अभ्यासातील हुशारी, शिकण्याचा वेग, चिकाटी आणि मेहनत घेण्याची अभिलाषा पाहून शिक्षकांनीही तिची सर्वतोपरी मदत केली आणि पुढे ती...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

रमणलाल नावाच्या व्यापाऱ्याला तीन मुले होती. व्यापाराचा चांगला जम असल्यामुळे रमणलालची परिस्थिती अतिशय उत्तम होती. मुलांमध्ये मात्र नेहमी वाद-विवाद आणि भांडणं होत त्याला तो कंटाळला. त्याने एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून सांगितले की, माझं आता वय झाल्यामुळे यापुढे व्यापार तुम्ही बघावा. पण आधी मी तुमची परीक्षा घेईन त्यात जो पास होईल त्याच्या हातात मी व्यापार देईल. त्याने तिघा मुलांना सारखे पैसे वाटले आणि...


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

एकीचे बळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

ऐकावे जनाचे करावे मनाचे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कष्टाची गोड फळे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

प्रामाणिकपणाचे फळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

बुद्धी आणि ताकदीचा मेळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कोल्ह्याला द्राक्ष आंबट


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

विज्ञानाची कास धरा


खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा.

मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू – प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका – उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी – एक खराब झालेला आंबा – दोन दिवसांनी पाहणी – नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब – संदेश –


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमचा विचार व कल्पकतेने ती कथा पूर्ण करा.

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.) 

तळेगाव गावात गोविंद नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची थोडीफार शेती होती व शेतीसाठी दोन बैलही त्याच्यापाशी होते. एक ढवळ्या व दुसरा पवळ्या अशी त्यांची नावे होती. त्यांची चांगली मैत्री होती. शेतात काम करायला ते एकत्र जात व एकत्रच परत येत पण एके दिवशी ________

खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.

हट्टी राजकन्या त्याला अर्धे राज्य मिळते
`↓` `↑`
राज्यकन्येची अट शेतकऱ्याचा मुलगा येतो
`↓` `↑`
न संपणारी गोष्ट सांगणे बरेच जण प्रयत्न करतात
`↓` `↑`
राज्यात दवंडी अर्धे राज्य

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

मुद्दे: अनाथ मुलगा – रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप – दुपारी शाळेत – रस्त्यात एक पाकीट मिळते – वर्गशिक्षकांकडे देणे – पाकिटावरील पत्यावरून योग्य व्यक्तिपर्यंत पोहोचवणे – मालकाला आनंद – शाबासकी – मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे.


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.

प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि.....
  • तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या.
  • कथा तयार करताना व लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या? ते लिहा.

पुढील मुद्दयांवरुन कथालेखन करा.

मुद्दे - एक राजा - त्याची प्रजा आळशी होती - त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो - रस्त्यात मधोमध दगड ठेवतो - त्यांच्याखाली - सोन्याची नाणी असलेली पिशवी - अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत - एक गरीब माणूस तो उचलतो - पिशवीतील नाणी त्याला मिळतात - लोकांना हे कळते - लोक उद्योगी बनतात -


खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

एक कोल्हा - भूक लागते - द्राक्षांची बाग - खाण्याची इच्छा - द्राक्षांचा वेल उंच - उड्या मारतो - थकतो - आंबट द्राक्षे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×