हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

आकृती मध्ये ΔPQR हा समभुज त्रिकोण असून बिंदू S हा रेख QR वर अशा प्रकारे आहे की, QS = 13 QR तर सिद्ध करा; 9PS2 = 7PQ2 - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृती मध्ये ΔPQR हा समभुज त्रिकोण असून बिंदू S हा रेख QR वर अशा प्रकारे आहे की, QS = `1/3` QR तर सिद्ध करा; 9PS2 = 7PQ

योग
Advertisements

उत्तर

पक्ष : ΔPQR हा समभुज त्रिकोण आहे.

QS = `1/3` QR

साध्य : 9PS2 = 7PQ

सिद्धता :

ΔPQR हा समभुज त्रिकोण आहे. ....[पक्ष]

∴ ∠P = ∠Q = ∠R = 60°  ....(i) [समभुज त्रिकोणाचे कोन]

PQ = QR = PR .....(ii) [समभुज त्रिकोणाच्या बाजू]

ΔPTS मध्ये, ∠PTS = 90°....[पक्ष]

PS2 = PT2 + ST2  ....(iii) [पायथागोरसचे प्रमेय]

ΔPTQ मध्ये,

∠PTQ = 90° ....[पक्ष]

∠PQT = 60° ...[(i) वरून]

∴ ∠QPT = 30° .....[त्रिकोणाचा उर्वरित कोन]

∴ ΔPTQ हा 30° - 60° - 90° त्रिकोण आहे.

∴ PT = `sqrt(3)/2` PQ  ....(iv) [60° कोनासमोरील बाजू]

QT = `1/2` PQ .....(v) [30° कोनासमोरील बाजू]

QS + ST = QT ......[Q – S – T]

∴ `1/3"QR" + "ST" = 1/2"PQ"`  .....[पक्ष व (v) वरून]

∴ `1/3"PQ" + "ST" = 1/2"PQ"` ....[(ii) वरून]

∴ ST = `"PQ"/2 - "PQ"/3`

∴ ST = `(3"PQ" - 2"PQ")/6`

∴ ST = `"PQ"/6`  ......(vi)

PS2 = `(sqrt(3)/2"PQ")^2 + ("PQ"/6)^2` ....[(iii), (iv) व (vi) वरून]

∴ `"PS"^2 = (3"PQ"^2)/4 + "PQ"^2/36`

∴ `"PS"^2 = (27"PQ"^2)/36 + "PQ"^2/36`

∴ `"PS"^2 = (28"PQ"^2)/36`

∴ `"PS"^2 = 7/9"PQ"^2`

∴ 9PS2 = 7PQ2  

shaalaa.com
कोनांची मापे 30°-60°-90° असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: पायथागोरसचे प्रमेय - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 पायथागोरसचे प्रमेय
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 | Q 16. | पृष्ठ ४६

संबंधित प्रश्न

ΔABC मध्ये, AB = `6sqrt3` सेमी, AC = 12 सेमी आणि BC = 6 सेमी तर ∠A चे माप किती? 


एका समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे, तर त्याची उंची काढा.


ΔRST मध्ये, ∠S = 90°, ∠T = 30°, RT = 12 सेमी तर RS व ST काढा.


एका समभुज त्रिकोणाची उंची `sqrt(3)` सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी व परिमिती काढा.


सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AB ⊥ BC, AB = BC, तर ∠A चे माप किती? 

 


सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AB = BC, AC = `2sqrt2`, ∠ABC = 90°. तर AB ची लांबी किती? 


4 सेमी बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची उंची किती? 


सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠CAB = 30° AC = 14, तर AB व BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠CAB = 30° यावरून, ∠BCA = `square`

30° – 60° – 90° त्रिकोणाच्या प्रमेयानुसार,

`square = 1/2 "AC" व  square = sqrt3/2 "AC"`.

∴ BC = `1/2 xx square` व AB = `sqrt3/2 xx 14`

BC = 7 व AB = `7sqrt3`. 


सोबतच्या आकृतीत, LK = `6sqrt2` तर MK, ML, MN काढा.

 


∆RST मध्ये, ∠S = 90°, ∠T = 30°, RT = 12 सेमी, तर RS काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×