हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

आकृती मध्ये, केंद्र X व Y असणारी अंतर्स्पर्शी वर्तुळे बिंदू Z मध्ये स्पर्श करतात. रेख BZ ही मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते. तर सिद्ध करा - रेख AX || रेख BY.

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृती मध्ये, केंद्र X व Y असणारी अंतर्स्पर्शी वर्तुळे बिंदू Z मध्ये स्पर्श करतात. रेख BZ ही मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते. तर सिद्ध करा - रेख AX || रेख BY.

 

योग
Advertisements

उत्तर

पक्ष: बिंदू X आणि Y ही वर्तुळांची केंद्रे आहेत.

साध्य: रेख AX || रेख BY.

सिद्धता:

ΔXAZ मध्ये, 

रेख XA ≅ रेख XZ  ......[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या] 

∴ ∠XZA ≅ ∠XAZ ....(i) [समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय]

तसेच, ΔYBZ मध्ये,

रेख YB ≅ रेख YZ  ......[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या] 

∴ ∠YZB ≅ ∠YBZ ......[समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय]

∴ ∠XZA ≅ ∠YBZ  .....(ii) [Y - X - Z, B - A - Z]

∴ ∠XAZ ≅ ∠YBZ   ......[(i) व (ii) वरून]

∴ रेख AX || रेख BY  ......[संगतकोन कसोटी] 

shaalaa.com
वर्तुळाची संकल्पना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: वर्तुळ - संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 [पृष्ठ ८६]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 3 वर्तुळ
संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 8. | पृष्ठ ८६

संबंधित प्रश्न

वर्तुळाचे कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नसतात, हे सिद्ध करा.


सोबतच्या आकृतीत रेख MN ही केंद्र O असलेेल्या वर्तुळातील जीवा आहे. MN = 25, जीवा MN वर बिंदू L असा आहे की ML = 9 आणि d(O,L) = 5 तर या वर्तुळाची त्रिज्या किती असेल?

 


एका बिंदूतून जाणारी किती वर्तुळे काढता येतील?


सोबतच्या आकृतीत, केंद्र A असलेल्या वर्तुळाला रेषा MN बिंदू M मध्ये स्पर्श करते. जर AN = 13 तसेच MN = 5 असेल, तर वर्तुळाची त्रिज्या काढा.

 


एका वर्तुळाच्या केंद्रापासून 15 सेमी अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी 12 सेमी असेल, तर त्या वर्तुळाचा व्यास काढा.


सोबतच्या आकृतीत, बिंदू M वर्तुळ केंद्र आणि रेख KL हा स्पर्शिकाखंड आहे. जर MK = 12, KL = `6sqrt3`, तर

  1. वर्तुळाची त्रिज्या काढा.
  2. ∠K आणि ∠M

 


आकृतीमध्ये, `square`ABCD च्या बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाचा केंद्र O आहे. जर AD ⊥ DC तसेच BC= 38, QB = 27, DC = 25 असेल, तर वर्तुळाची त्रिज्या काढा.

 


बिंदू A, B आणि C केंद्र असलेली तीन वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात. जर AB = 36, BC = 32 आणि CA = 30 असेल, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या काढा.


एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. तर त्या वर्तुळातील सर्वात मोठया जीवेची लांबी किती?


O केंद्र असलेल्या वर्तुळाची AB जीवा आहे. AOC वर्तुळाचा व्यास आहे. स्पर्शिका AT वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते.

खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा.
  2. ∠CAT व ∠ABC ची मापे काढा व त्याचे कारण लिहा.
  3. ∠CAT व ∠ABC एकरूप आहेत का? स्पष्टीकरण लिहा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×