हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

आकृतीमध्ये, □ABCD च्या बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाचा केंद्र O आहे. जर AD ⊥ DC तसेच BC= 38, QB = 27, DC = 25 असेल, तर वर्तुळाची त्रिज्या काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृतीमध्ये, `square`ABCD च्या बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाचा केंद्र O आहे. जर AD ⊥ DC तसेच BC= 38, QB = 27, DC = 25 असेल, तर वर्तुळाची त्रिज्या काढा.

 

योग
Advertisements

उत्तर

पक्ष: AD ⊥ DC

BC = 38, QB = 27, DC = 25

काढा : वर्तुळाची त्रिज्या OP.

उकल:

BC = 38 ...........[पक्ष}

∴ BQ + QC = 38 …[B – Q – C] 

∴ 27 + QC = 38 ..........[पक्ष}

∴ QC = 38 – 27

∴ QC = 11 एकक .............(i)

आता, QC = SC ............[स्पर्शिकाखंडाचे प्रमेय]

∴ SC = 11 = एकक ...... (ii) [(i) वरून]

DC = 25 ................[पक्ष}

∴ DS + SC = 25 …[D – S – C]

∴ DS + 11 = 25 ......[(ii) वरून]

∴ DS = 25 – 11

∴ DS = 14 एकक .............(iii)

`square`DSOP मध्ये,

∠P = ∠S = 90° ............[स्पर्शिका-त्रिज्या प्रमेय]

∠D = 90° ...................[पक्ष}

∴ ∠O = 90° ..........…[`square`DSOP चा उर्वरित कोन]

∴ `square`DSOP हा आयत आहे.

तसेच, OP = OS ........[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]

∴ `square`DSOP हा चौरस आहे. .......[जर आयताच्या संलग्न बाजू समान असतील, तर तो चौरस असतो.]

∴ OS = DS = DP = PO .........(iv) [चौरसाच्या बाजू]

∴ OP = 14 एकक ...........[(iii) आणि (iv) वरून]

∴ वर्तुळाची त्रिज्या 14 एकक आहे.

shaalaa.com
वर्तुळाची संकल्पना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: वर्तुळ - Q ८

संबंधित प्रश्न

प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. 

परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते. जर त्यांच्या केंद्रांतील अंतर 12 सेमी असेल, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे?


आकृती मध्ये, केंद्र X व Y असणारी अंतर्स्पर्शी वर्तुळे बिंदू Z मध्ये स्पर्श करतात. रेख BZ ही मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते. तर सिद्ध करा - रेख AX || रेख BY.

 


वर्तुळाचे कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नसतात, हे सिद्ध करा.


सोबतच्या आकृतीत रेख MN ही केंद्र O असलेेल्या वर्तुळातील जीवा आहे. MN = 25, जीवा MN वर बिंदू L असा आहे की ML = 9 आणि d(O,L) = 5 तर या वर्तुळाची त्रिज्या किती असेल?

 


एका बिंदूतून जाणारी किती वर्तुळे काढता येतील?


सोबतच्या आकृतीमध्ये, केंद्र C असलेल्या वर्तुळाची रेख DE ही जीवा आहे. रेख CF ⊥ जीवा DE आणि DE = 16 सेमी, तर DF ची लांबी काढा. 

 


सोबतच्या आकृतीत, बिंदू M वर्तुळ केंद्र आणि रेख KL हा स्पर्शिकाखंड आहे. जर MK = 12, KL = `6sqrt3`, तर

  1. वर्तुळाची त्रिज्या काढा.
  2. ∠K आणि ∠M

 


आकृतीमध्ये, P केंद्र असलेले वर्तुळ O केंद्र असलेल्या अर्धवर्तुळाला Q व C बिंदूंत स्पर्श करते. जर व्यास AB = 10, AC = 6 असेल, तर लहान वर्तुळाची त्रिज्या x किती?

 


बिंदू A, B आणि C केंद्र असलेली तीन वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात. जर AB = 36, BC = 32 आणि CA = 30 असेल, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या काढा.


एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. तर त्या वर्तुळातील सर्वात मोठया जीवेची लांबी किती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×