English

युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या.

Short/Brief Note
Advertisements

Solution

अमेरिका खंडाचा शोध लागल्यानंतर तेथे वसाहती स्थापन करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांत विविध कारणांसाठी चढाओढ सुरू झाली.

(१) पोर्तुगाल आणि स्पेन यांना तेथे सोन्याचे साठे सापडले. खाणींमधून अफाट खनिज संपत्ती मिळू लागली.

(२) स्थानिक रेड इंडियन्स आणि आफ्रिकेतून आणलेले गुलाम यांच्याकडून ते ऊस, तंबाखू यांचे उत्पादन तयार करून घेऊ लागले.

(३) स्पेन, पोर्तुगाल यांची झालेली भरभराट पाहून इंग्लंड, हॉलंड व फ्रान्स यांनी अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली.

(४) अमेरिकेतून कच्चा माल आपल्या देशात नेऊन तेथून पक्का माल तयार करून अमेरिकन वसाहतींत विकला जाऊ लागला. हक्काची बाजारपेठ म्हणून युरोपियनांनी येथे आपल्या वसाहती स्थापन केल्या.

shaalaa.com
युरोपीय वसाहतवाद - अमेरिकेतील वसाहतवाद
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: युरोपीय वसाहतवाद - स्वाध्याय [Page 18]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 2 युरोपीय वसाहतवाद
स्वाध्याय | Q ५.२ | Page 18
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×