Advertisements
Advertisements
Question
वस्तू विपणन मिश्रणाचे ४ पी (4Ps) स्पष्ट करा.
Explain
Advertisements
Solution
- वस्तू: उत्पादनामध्ये वस्तू आणि सेवांचा समावेश होतो, की ज्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिल्या जातात. उत्पादन हे वस्तू किंवा सेवेच्या स्वरूपात असून दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात असते. बाजाराचे सखोल संशोधन करून व्यवसायाला उत्पादनाचा योग्य प्रकार ठरविण्याची गरज असते. व्यवसायाचे यश हे, वस्तूचा ग्राहकांच्या मनावर जो प्रभाव पडतो, त्यावर अवलंबून असते.
- किंमत: वस्तूची किंमत म्हणजे मूलतः अशी रक्कम की जी ग्राहक वस्तूंची खरेदी करताना देतो. वस्तूला मागणी निर्माण होण्यासाठी किंमत हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. वस्तूंची किंमत निश्चित करताना व्यवसायाने कमालीची काळजी घेतली पाहिजे. वस्तूंचा उत्पादन खर्च व वस्तूंसाठी पैसे खर्च करण्याची ग्राहकाची इच्छा या गोष्टी वस्तूंची किंमत निश्चित करताना महत्त्वाची भूमिका पार पाडतात. किंमत जास्त असेल तर, त्याचा परिणाम ग्राहकांच्या मागणीवर होतो आणि किंमत फारच कमी असेल तर व्यवसायाच्या नफ्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून किंमत निश्चित करताना ग्राहकांनी वस्तूची असणारी उपयुक्तता व मूल्य यांचा विचार करावा.
- स्थान: स्थान किंवा ठिकाणाला वितरण व्यवस्था असेही म्हणतात. स्थान, निश्चिती किंवा वितरण व्यवस्था या गोष्टी विपणनात फार महत्त्वाच्या असतात. योग्य उत्पादन योग्य किमतीला बनविणे एवढेच पुरेसे नसून व्यावसायिकांना ते उत्पादन संभाव्य ग्राहकांना योग्य ठिकाणी उपलब्ध करून देणेसुद्धा फार महत्त्वाचे असते. यामध्ये, ग्राहकांना वस्तू उपलब्ध करून देण्याच्या ठिकाणचा, वितरणाचा आणि वितरणाच्या मार्गांचा समावेश होतो. वस्तू वितरणाची साखळी जेवढी चांगली तेवढे बाजारपेठ व्यापणे सोपे जाते.
- संवर्धन किंवा विक्रयवृद्धी: विक्रयवृद्धी हा विपणनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असून विक्रीमध्ये स्वतः ची ओळख निर्माण करतो. विक्रयवृद्धी हे विपणन संदेशवहनाचे असे साधन आहे की, जे ग्राहकांपर्यंत आपल्या वस्तूला प्रसिद्धी मिळवून देते. संभाव्य ग्राहकांना वस्तूंच्या वैशिष्ट्याविषयी माहिती देण्यास मदत करते व खरेदी करण्यास प्रवृत्त करते. विक्रयवृद्धी मिश्रणामध्ये जाहिरात, प्रत्यक्ष विपणन, विक्रयवृद्धी, व्यक्तिगत विक्री इ. साधनांचा समावेश होतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
